Ticker

6/recent/ticker-posts

दिव्यांग कलाकाराने वाहिली भारतरत्न बाबासाहेबांना गायनातून श्रद्धांजली




पुसद :- येथील वसंत नगर मध्ये विश्वरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून अभिवादनाचा  कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी शिवसेना नेते ऍड.उमाकांत पापिनवार ‌‌,      वसंतनगर पो. स्टे.चे ठाणेदार परदेशी साहेब, राष्ट्रीय दिव्यांग संघाचे अध्यक्ष  शैलेश दळवे , बाळासाहेब वाठोरे, लक्ष्मण कांबळे, राजेश ढोले, शिवशंकर घरडे , ऍड.प्रभाकर विघ्ने यांचेसह कार्यक्रमाचे आयोजक भिम पॅंथर ,सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष देवाभाऊ जगताप,गणेशभाई कांबळे (महाराष्ट्र अध्यक्ष) , आकाशभाई सावळे (विदर्भ अध्यक्ष) भय्यासाहेब मनवर(युवा उपजिल्हाध्यक्ष),मोहम्मद आजिम (तालूका संघटक) , दिगांबर सुर्यवंशी , समाधान केवटे ,सचिन धूळे , विजय जाधव , , यादव हाटे ,सोनू आसोले वैभव खंदारे,  मधूकर सोनूने हे सर्व भिम पॅंथरचे कार्यकर्तेउपस्थित होते.

   सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते मेणबत्ती प्रज्वलित करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसह  सर्व महामानवाच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून  अभिवादन करण्यात आले.  त्यानंतर राष्ट्रीय दिव्यांग संघाच्या चमूने, बहारदार  भीम गीताचा माध्यमातून  बाबासाहेबांना अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण केली.

 ऍड.उमाकांत पापिनवार यांनी  धर्मनिरपेक्ष समाजकार्याची दखल घेउन  देवाभाऊ जगताप यांना महाराष्ट्राचे आराध्यदैवत  छत्रपती शिवाजी राजे यांची प्रतिमा व त्यागाचे प्रतिक भगवा शेला देऊन त्यांचे व सर्व टिम चे कौतुक केले .या कार्यक्रमाला भिम पॅंथर महिला मंडळ, बाल बालिका तसेच बहुसंख्य तसेच मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

यवतमाळ पुसद प्रतिनिधी राजेश ढोले

Post a Comment

0 Comments