Ticker

6/recent/ticker-posts

शेतकर्‍यांना हरभरा पीक व्यवस्थापणावर मार्गदर्शन



रिलायन्स फाऊंडेशन आणि डॉ PDKV अकोला चा उपक्रम 

रब्बी हंगामात घेतल्या जाणार्‍या पिकापैकी हरभरा हे एक महत्वाचे कडधान्य पिक आहे. या पिकाचे शेती आणि मानवी आहारात अनन्य साधारण असे महत्व आहे.  प्रगतीशील शेतकर्‍यांच्या शेतावरील नव्या वाणांचे उत्पादन हेक्टरी 30 ते 35 क्विं/हे पर्यंत जाऊ शकते असा अनुभव आहे पारंपारिक पद्धतीमध्ये थोडासा बदल करुन पीक उत्पादन तंत्रज्ञानाची जोड देवून सुधारित वाणांचा वापर केल्यास या पिकापासून कोरडवाहु क्षेत्रातसुद्धा चांगले उत्पादन मिळते.आणि याच अनुषंगाने रिलायन्स फाऊंडेशन आणि डॉ पंजाबराव देशमुख  कृषि विद्यापीठ अकोला यांनी संयुक्त पणे हरभरा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता .ज्या मध्ये डॉ विनोद खडसे कृषि विद्यावेत्ता तसेच डॉ चिकटे मॅडम यांनी सहभागी शेतकर्‍यांना दिनांक 25/11/2020 रोजी मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करताना खडसे साहेब म्हणाले की हरभरा लागवड करताना सर्व बाबींचा विचार करणे गरजेचे आहे आहे ज्यामधे जमीन,पेरणीची वेळ,बीजप्रक्रिया, पेरणी ,खत मात्रा , बियाणे प्रमाण , आंतरमशागत , पीक संरक्षण, पाणी व्यवस्थापन एत्यादी बाबींचा समावेश होतो .पाणी व्यवस्थापणा संदर्भात बोलताना ते म्हणाले की जिरायत हरभरा क्षेत्रात जमिनीतील ओलावा खूपच कमी असेल आणि एखादे पाणी देणे शक्य असेल तर हरभरा पिकाला फुले येऊ लागताच पाणी द्यावे. बागायत हरभरा शेताची रानबाधंणी करताना दोन साऱ्यातील अंतर कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा. तसेच लांबी सुध्दा जमिनीच्या उतारानुसार कमी ठेवावी म्हणजे पिकाला प्रमाणशीर पाणी देण्यास सोयीचे होते. मध्यम जमिनीत 20 ते 25 दिवसांनी पहिले, 45 ते 50 दिवसांनी दुसरे आणि 65 ते 70 दिवसांनी तिसरे पाणी द्यावे. भारी जमिनीकरिता पाण्याच्या दोनच पाळया पुरेशा होतात त्याकरिता 30-35 दिवसांनी पहिले व 60-65 दिवसांनी दुसरे पाणी दयावे. हरभरा पिकाला सर्वसाधारणपणे 25 सेंमी पाणी लागते. प्रत्येक वेळी पाणी प्रमाणशीर (7 ते 8 से.मी) देणे महत्वाचे असते. जास्त पाणी दिले तर पीक उभळण्याचा धोका असतो. स्थानिक परिस्थितीनुसार व जमिनीच्या खोलीनुसार पाण्याच्या दोन पाळयांमध्ये अंतर ठेवावे. जमिनीस फार मोठ्या भेगा पडू देऊ नयेत. हरभरा पिकास एक पाणी दिल्यास 30 टक्के, दोन पाणी दिल्यास 60 टक्के आणि  तीन पाणी दिल्यास उत्पादनात दुप्पट  वाढ होते. तसेच डॉ चिकटे मॅडम यांनी किडरोग व्यवस्थापणावर सविस्तर मार्गदर्शन केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन विलास सवाणे (जिल्हा व्यवस्थापक रिलायन्स फाउंडेशन)यांनी केले होते या कर्यक्रमाला रिलायन्स फाउंडेशनचे अकोला   कार्यक्रम सहाय्यक अभिषेक सोरते यांनी सहकार्य केले. 

Post a Comment

0 Comments