Ticker

6/recent/ticker-posts

नगरसेवक साकिब शहा, यांचे न प मुख्यालयासमोर आमरण उपोषण



पुसद येथील न.प अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या 500 च्या वर घरकुलांचे  थकीत हप्ते  एक वर्षाचा कालावधी होऊन गेला तरी सुद्धा  न मिळाल्याने अनेकांना भाड्याच्या घरामध्ये तर, काहींना झोपडीत व  उघड्यावर राहावे लागत आहे.

 या समस्यांची माहिती   असलेले नगरसेवक सकिब शहा यांनी   मुख्य, प्रशासनाला वेळोवेळी माहिती देऊन व लाभार्थ्याची मागणी रेटून धरली परंतु प्रशासन, विरोधक, आणि सत्ताधारी यांनी  वेळोवेळी दुर्लक्ष केल्याने  व साथ न दिल्याने अखेर  शेवटी  उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे असे साकिब शहा म्हणाले.लाभार्थी यांनी सुद्धा उपोषणास सहभाग नोंदवला आहे.

हक्काच्या लढाईसाठी, लढल्या जाणाऱ्या नगरसेवक साकिब शाह यांच्या उपोषणाला पुसद येथील भिम टायगर सेना,मनसे ,अन्याय अत्याचार निर्मुलन समिती, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले,, तसेच अनेक  व सामाजिक  व राजकीय पक्षाच्या कार्यकर्ता  व पदाधिकारी यांनी भेटी देऊन  पाठिंबा दर्शविला आहे...

 यवतमाळ/ पुसद प्रतिनिधी राजेश ढोले

Post a Comment

0 Comments