Ticker

6/recent/ticker-posts

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली



डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली.विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विलास भाले यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या भावपूर्ण कार्यक्रम प्रसंगी संचालक विस्तार शिक्षण डॉ. दिलीप मानकर, संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुधीर वडतकर, अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ प्रकाश नागरे यांचेसह सर्व सहयोगी अधिष्ठाता, शास्त्रज्ञ,विभाग प्रमुख, अधिकारी कर्मचारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण संचालनालया द्वारे आयोजित कार्यक्रम प्रसंगी माननीय कुलगुरू महोदयांनी क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले आणि कृषी क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय पंजाबराव देशमुख यांचे प्रतिमेला माल्यार्पण केले. याप्रसंगी मा. कुलगुरू आणि इतर सर्व सन्माननीय अधिकारी कर्मचारी वर्गाने महात्मा ज्योतिबा फुले यांना आदरांजली अर्पण केली.



Post a Comment

0 Comments