Ticker

6/recent/ticker-posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी निधी


वरुड / प्रतिनिधी :वरुड तालुक्यातील बेनोडा महसूल मंडळात दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी रात्री दरम्यान अचानक आलेला पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे नुकसान भरपाई मिळण्यासंदर्भात दिनांक 9 जानेवारी 2025 रोजी मंत्रालय मुंबई येथे संबंधित विभागाचे मंत्री व सचिव यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला. तसेच तातडीने नुकसान भरपाई मिळण्याबाबत मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदजी जाधव साहेब यांच्याकडे विनंती करण्यात आली होती. दरम्यान आज दिनांक 21 जानेवारी 2025 रोजी शासन स्तरावरून नुकसान भरपाई मिळण्याबाबत शासन आदेश पारित करण्यात आला आहे. त्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे.
    आमदार उमेश यावलकर" यांनी वेळोवेळी मंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला, तर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदजी जाधव यांची सकारात्मक भूमिका यशस्वी ठरली. “नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देणे हे माझे प्राथमिक कर्तव्य आहे. शेतकऱ्यांसाठी माझा लढा कायम राहील,” असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, व मदत मंत्री मकरंदजी जाधव यांच्या प्रयत्नांमुळे हा निर्णय शक्य झाला. या निधीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांनी आमदार उमेश यावलकर यांचे आभार व्यक्त केले.


Mantri baithak mumbai (1).jpeg

Post a Comment

0 Comments