-178.32 कोटी प्राप्ती, तर 258.60 कोटी खर्चाचा अंदाज
-80.28 कोटींची तुट
-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली अधिसभा शांततेत संपन्न
अमरावती संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा 2023-24 चा अर्थसंकल्प अधिसभेत मंजूर करण्यात आला. विद्यापीठाचा विकासात्मक व विद्यार्थी केंद्रीत असा अर्थसंकल्प असून त्यात 178.32 कोटीची प्राप्ती, तर 258.60 कोटीच्या खर्चाचा अंदाज अर्थसंकल्पात दर्शविण्यात आला असून यावर्षी 80.28 कोटीची तुट त्यात दर्शविण्यात आली आहे. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली आज अधिसभा संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगांवकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, तर सभागृहात सर्व सन्माननिय सभासद उपस्थित होते.
कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी अर्थसंकल्प सभागृहात सादर केला. अर्थसंकल्पावर सखोल चर्चा सन्माननिय सदस्यांनी केली. काही दुरुस्त्या सूचविल्यात, त्यानंतर हा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला.
विद्यापीठाचे उत्पन्न स्त्रोत
- वेतन व भत्ते 105.24 कोटी
- परीक्षा शुल्क 46.97 कोटी
- शैक्षणिक विभाग 3.30 कोटी
- महाविद्यालयांकडून 2.02 कोटी
- इतर 9.44 कोटी
- विकासासाठी 47.15 लक्ष
- स्वतंत्र प्रकल्प वा योजना आणि सहयोग कार्यक्रम अनुदानांतर्गत 7.35 कोटी प्राप्त होतील.
विद्यापीठाचा खर्च
- वेतन व भत्ते 105.72 कोटी
- परीक्षा खर्च 45.87 कोटी
- शैक्षणिक विभाग 6.49 कोटी
- विद्यापीठ ग्रंथालय 1.67 कोटी
- क्रीडा व शारीरिक शिक्षण 2.23 कोटी
- इतर खर्च 46.13 कोटी
- विकासांतर्गत होणारा खर्च 39.43 कोटी
- स्वतंत्र प्रकल्प योजना/सहयोग कार्यक्रम 7.46 कोटी
विद्यापीठासमोरील आव्हाने
- अर्थसंकल्पात रु. 178.32 कोटीची प्राप्ती तर 258.60 कोटी खर्चाचा अंदाज
- 80.28 कोटीची तरतूद
-अर्थसंकल्पीय तूट कमी करण्यासाठी विविध अनुदान संस्थांकडून निधी गोळा करण्यात येईल.
सन 2023-24 च्या अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट¬े
- प्रशिक्षण व उद्योजकता विकास अंतर्गत रु. 5 लक्ष
- कौशल्य विकास व प्रशिक्षणासाठी रु. 5 लक्ष आणि नवसंशोधन अंतर्गत रु. 11 लक्ष
- संत गाडगे बाबा एस.टी. बस पास योजनेंतर्गत रु. 5 लक्ष
- संत गाडगे बाबा विद्यार्थी शिक्षण संरक्षण योजनेंतर्गत रु. 5 लक्ष
- संत गाडगे बाबा शुध्द पेयजल योजनेकरीता रु. 8 लक्ष
- संत गाडगे बाबा विद्याधन योजनेंतर्गत रु. 5 लक्ष
- सायकल योजनेसाठी रु. 3 लक्ष 10 हजार,
- विद्यार्थी सुरक्षा विमा अंतर्गत रुपये 35 लक्ष
- बुलडाणा येथील आदर्श पदवी महाविद्यालयाकरीता 1.27 कोटी
- आविष्कार अंतर्गत - 29 लक्ष
- ग्रंथालयीन सुविधा - 2.92 कोटी
- मुलांचे व मुलींचे वसतीगृहासाठी 9.92 लक्ष
शिक्षक व प्रशासकीय कर्मचा-यांसाठी योजना
- गृह बांधणी अग्रिम योजनेंतर्गत रु. 5 कोटी
- दुचाकी वाहन खरेदी करण्याकरीता रु. 3 कोटी
- कुलगुरू शैक्षणिक उत्कृष्टता अवार्ड योजना रु. 10 लक्ष
- विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालय शिक्षक प्रशिक्षण रु. 7 लक्ष
- प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी प्रशिक्षण रु. 3 लक्ष
- बहुसुविधा केंद्रासाठी रु. 1.50 कोटी
नवीन पुढाकार
- विद्यापीठाव्दारे प्रशिक्षण व रोजगार सेल रु. 15 लक्ष
- विद्यापीठस्तरीय संशोधन अनुदान योजना रु. 2 कोटी
- पीएच. डी. विद्यार्थी फेलोशिप योजना रु. 30 लक्ष
-इंटर्नशिप योजनासाठी रु. 5.10 लक्ष
- जलसंवर्धन योजनेकरीता रु. 25 लक्ष
- सुंदर व सुशोभिकरण - 50 लक्ष
- आय.सी.टी. करीता - 35 लक्ष
अतिकेंद्रित योजना
- समान संधी कक्ष 1.90 कोटी
- बेस्ट प्रॅक्टिसेस अंतर्गत रु. 54.55 लक्ष
- दुरस्थ शिक्षण रु. 11 लक्ष
- माजी विद्यार्थी योजना रु. 12.90 लक्ष
- संत गाडगे बाबा सायकल योजना रु. 3.10 लक्ष
- यु.एस.आर. रु. 12 लक्ष
- लोणार सरोवर विकासासाठी रु. 2.28 कोटी
विशेष तरतुदी
- प्रशासकीय इमारतीकरीता रु. 1 कोटी
- बृहत आराखडा नवीन प्रकल्प रु. 1.32 कोटी
- बहुउद्देशीय सभागृह उभारण्यासाठी रु. 1.32 कोटी
- मुलींसाठी मेस इमारत बांधकामासाठी रु. 1.50 कोटी
- योग शास्त्र प्रयोगशाळा करीता रु. 30 लक्ष
अर्थसंकल्पाची वैशिष्ट¬े
- स्वच्छ भारत-स्वस्थ भारत योजनेसाठी रु.1.77 लक्ष
- बेस्ट प्रॅक्टीस इन युनिव्हर्सिटी अंतर्गत 5 लक्ष
- विद्यार्थी सुरक्षा विमा अंतर्गत 35 लक्ष
- ग्रंथालय सुविधेकरीता 2.92 कोटी
- बुलडाणा येथील आदर्श पदवी महाविद्यालयाकरीता 1.27 कोटी
- संत गाडगे बाबा विद्याधन योजनेकरीता 5 लक्ष
- आपत्ती नियोजन अंतर्गत विविध कार्यक्रम, शिबीरासाठी 1.3 कोटी
- संत गाडगे बाबा एस.टी. बस पास योजना रु. 5 लक्ष रुपये, संत गाडगे बाबा विद्यार्थी शिक्षण संरक्षण योजना रु. 5 लक्ष
- संत गाडगे बाबा शुध्द पेयजल योजना रु. 8 लक्ष
- इक्वल अपॉच्र्युनिटी सेल 1.90 कोटी
- डाएट कौन्सिलिंग सेंटरकरीता 67 हजार
- सोशल कनेक्ट अंतर्गत 11.50 लक्ष
- अॅकेडमिक डेव्हलपमेंट अॅक्टीव्हीटीज 11 लक्ष
- ट्रेनिंग अॅन्ड एन्टरप्रेन्यूअरशिप डेव्हलपमेंट अंतर्गत 5 लक्ष रुपयांची तरतूद.
- स्किल डेव्हलपमेंट अॅन्ड ट्रेनिंग 5 लक्ष
- बोर्ड ऑफ इनोव्हेशन अॅन्ड इनक्युबेशन लिंकेजेस अॅन्ड एन्टरप्राईजेससाठी 11 लक्ष
- ट्रेनिंग अॅन्ड प्लेसमेंट सेल 15 लक्ष
- युनिव्हर्सिटी लेव्हल रिसर्च फंडिंग स्किम 2 कोटी
- पी.एच.डी. स्टुडंट फेलोशिप 10.10 लक्ष
- इटर्नशिप स्किम करीता 5 लक्ष
अर्थसंकल्प एक दृष्टिक्षेप
- 2021-22 चे अंदाजपत्रक 86 कोटी रुपये, तर 2022-23 ते अंदाजपत्रक 95 कोटी रुपये तुटीचे होते. परंतु प्रत्यक्षात ही तूट न राहता प्रस्तावितपैकी वर्ष अखेरीस आधिक्य राहील. यासह 2022-23 मधील प्रस्तावित प्राप्ती व खर्चाचा विचार करता 2023-24 मधील प्रस्तावित अर्थसंकल्प अंदाजे रुपये 80 कोटी तुटीचा प्रस्तावित आहे.
- परिरक्षण विकास, स्वतंत्र प्रकल्प, योजना व अन्य अनुदाने यापासून अंदाजे रुपये 178 कोटींचा प्राप्तीचा, तर रुपये 266 कोटी खर्चाचा अंदाज आहे.
- दरवर्षी अपेक्षित प्राप्ती आणि अंदाजित खर्च यामध्ये सातत्याने निर्धारित दराने वाढ होईल, यासाठी प्रयत्नशील राहण्यास विद्यापीठ कटीबध्द आहे.
- विद्यापीठ साधारण निधीवर पडणारा भार कमी होऊन अन्य साधनांपासून प्राप्त होईल, यासाठी विद्यापीठ 2023-24 पासून प्रयत्नशील राहील. तसेच विद्यापीठातील संशोधन, गुणवत्तावर्धक शिक्षण, शैक्षणिक विस्ताराचे कार्य आणि विद्यापीठाची समाजाभिमुखता या बाबींचा विचार करण्यात आला आहे.
- विद्यापीठाची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, खर्च भागविण्यासाठी आणि वैविध्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी परिरक्षण यामधील विविध शिर्षातून अधिक प्राप्तीची अपेक्षा.
- शिक्षण, संशोधन, विस्तार कार्यासाठी अधिकाधिक अनुदान प्राप्तीसाठी विद्यापीठ प्रयत्नशील राहील. यामुळे विद्यापीठ साधारण निधीवरील भार कमी होऊन गुणवत्ताविषयक कार्यक्रमांवर खर्च करणे सहज शक्य होईल.
- आर्थिक वर्ष 2023-24 मधील प्रस्तावित तूट भरुन काढण्यासाठी विविध प्रकारच्या अधिकाधिक प्राप्ती अनुदानातून होण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील राहील.
अधिसभेचा आजच्या कामकाजात मागील सभेचे कार्यवृत्त कायम करुन कार्यवृत्तावरील अनुपालन अहवाल सादर करण्यात आला. प्रश्नोत्तराच्या तासामध्ये सदस्य डॉ. आर.बी. सिकची, डॉ. रविंद्र मुन्द्रे, डॉ. सुभाष गवई, डॉ. संतोष बनसोड, डॉ. प्रशांत विघे, श्री कैलास चव्हाण, श्री प्रताप अभ्यंकर, श्री अमोल देशमुख, श्रीमती मयुरी जवंजाळ, प्रा. अविनाश बोर्डे, डॉ. नितीन टाले यांनी विचारलेल्या प्रश्नांवर साधकबाधक चर्चा सभेत झाली. यावर विविध सदस्यांनी मते मांडली.
सन 2021-22 चा मराठी व इंग्रजी वार्षिक अहवाल प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगांवकर यांनी सभेत सादर केला व तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
0 Comments