Ticker

6/recent/ticker-posts

बाळासाहेबांशिवाय बहुजणांना तारणहार नाही- प्रा. डॉ. संतोष हुशे

Visheshank Prakashan Santosh Hushe copy


विदर्भदूत न्यूज नेटवर्क

अकोला/प्रतिनिधी- आज देशात अत्यंत भयावह परिस्थिती आहे, देशभरात बहुजणांच्या हक्कांवर गदा येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बाळासाहेब उर्फ प्रकाश यशवंत आंबेडकर यांच्याशिवाय बहुजणांना कोणीही तारणहार नसल्याचे प्रतिपादन समाजसेवक तथा ओबीसी नेते प्रा. डॉ. संतोष हुशे यांनी व्यक्त केले. श्रद्धेय अॅड. बाळासाहेब अंाबेडकर अभिष्टचिंतन विशेषांक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

श्रद्धेय अॅड. बाळासाहेब अंाबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवनकार्यावर आधारित विदर्भदूत वृत्तपत्रसमुहातर्फे ''अभिष्टचिंतन विशेषांकÓÓ स्थानिक हुशे ज्वेलर्स येथील डॉ. हुशे यांच्या जनसंपर्क कार्यालयात प्रकाशित करण्यात आला. यावेळी आयोजित छोटेखाणी कार्यक्रमात डॉ. हुशे यंानी आपले मत व्यक्त केले. यावेळी या कार्यक्रमाला विदर्भदूतचे संपादक संजय निकस, नारी ललकारचे पंजाबराव वर, प्रविण गांजरे, संदीप रोकडे, अक्षय पाटील, पत्रकार गजानन चिंचोळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलतांना प्रा. डॉ. संतोष हुशे म्हणाले की, प्रकाश यशवंत आंबेडकर यांचा जन्म 10 मे, 1954 ला बॉम्बे स्टेट (सध्याचे मुंबई) मध्ये झाला. त्यांचे प्रकाश हे नाव त्यांचे आजोबा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ठेवलेले आहे. त्यांना देशभरात बाळासाहेब आंबेडकर या नावाने ओळखले जाते. भारतीय राजकारणात, समाजकारणात त्यांची एक वेगळी ओळख आहे. बाळासाहेब भारिप बहुजन महासंघ या राजकीय पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष आहेत. बाळासाहेब आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. बाळासाहेब हे दोनदा लोकसभा व एकदा राज्यसभा असे एकूण तीन वेळा संसदचे सदस्य (खासदार) राहिलेले आहेत. 2018 मध्ये त्यांनी सुमारे 100 लहान-मोठ्या राजकीय पक्षांना एकत्र घेत वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षाची स्थापना केली. 

आज घडीला देशातील परिस्थिती पहाता वंचित बहुजन आघाडीशिवाय राज्याला पर्याय नाही. कारण बाळासाहेबांच्या दूरगामी विचार हा समस्त बहुजणांच्या विकासासाठीचा आहे, हे सर्वानी प्रथम लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे, असेही यावेळी डॉ. हुशे यांनी म्हटले. यावेळी सर्वांनी विशेषांकाचे कौतुक केले.

Visheshank Prakashan Santosh Hushe 1


Post a Comment

0 Comments