Ticker

6/recent/ticker-posts

बुलडाणा अर्बन कडून खास सभासदांसाठी हापूस आंबा विक्रीस उपलब्ध

 


बुलडाणा-येथील विविध सामाजिक उपक्रमात सदैव अग्रेसर राहणा-या बुलडाणा अर्बन कडून नुकतेच सभासद ठेवीदार, ग्राहक, कर्मचारी  यांच्या साठी रत्‍नागिरीचा हापूस आंबा दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी विक्रीस उपलब्ध करुन देण्यात आला आहे. आंबा खरेदीस नागरिकांच्या झुंबड होतांना दिसून येत आहे. 

सामाजिक, शैक्षणिक, राजकिय आदी विविध क्षेत्रात सदैव अग्रेसर राहणा-या बुलडाणा अर्बन परिवाराकडून  सभासदांसाठी सुख सुविधेच्या वस्तू कमी भावात उपलब्ध व्हाव्यात यासाठी बुलढाणा अर्बन कंज्यूमर स्टोअर्सची स्थापना केली आहे. बुलडाणा अर्बन च्या सभासद ग्राहक,कर्मचारी तसेच ठेविदारासाठी  या स्टोअर्स मधून दर्जेदार गहू, पाणिपत ब्लांकेट्स , असे अनेक वस्तु उपलब्ध करुन दिल्या जातात. देशभरात रत्‍नागिरीचा हापूस प्रसिध्द आहे. जिल्हयातील अनेकांचे रत्‍नागिरी येथे जाणे होत नाही. तसेच काही व्यापारी हापूस विक्री करतात, मात्र व्यापारीवर्ग चुकीच्या पध्दतीने हापूस पिकवितात, त्‍यामुळे त्‍याची खरी चव ग्राहकांना मिळत नाही. तसेच आरोग्याचा विषय देखील या आंबा पिकविण्याच्या विषयाशी संबंधित असल्याने अनेकजन ईच्छा असून सुध्दा हापूस खरेदी करीत नाही. अशा ग्राहकांसाठी खास बुलडाणा अर्बनच्यावतीने बुलढाणा अर्बन कंज्यूमर स्टोअर्सच्या माध्यमातून हापूस उपलब्ध करुन देण्यात आला आहे. याची पहिली खेप आज येथील प्रसिध्द डॉक्टर दुर्गासिंग जाधव यांना बुलडाणा अर्बन चे चिफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ सुकेशजी झंवर यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी यावेळी ॲड. जितेंद्र कोठारी, संचालक विनोदजी केडीया, बुलडाणा अर्बन कंन्झ्युमर चे व्यवस्थापक संजय कस्तुरे, साम टिव्ही चे संजय जाधव,नरेंद्र शर्मा, ठाकूर क्लासेस चे संचालक  ठाकूर सर तसेच बुलडाणा अर्बन चे सभासद, ग्राहक, व मुख्यालयातील कर्मचारी अरुण दलाल, मोहन दलाल, गजानन चवरे, मोरेश्वर जोशी , राजेंद्र वानेरे, कैलास मोरे, प्रशांत कुलकर्णी, संजय कुलकर्णी, प्रशांत धारकर, श्रीकांत जोशी, ई. मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments