Ticker

6/recent/ticker-posts

सेक्सटोर्शन- संजय निकस पाटील

Sextortion Vidarbhadoot Buldhana 1


 ...आता ऑनलाईन फसवणूकीचा नवा मार्ग, सेक्सटॉर्शन

अवघ्या जगाला मुठीत घेण्याची करतब इंटरनेट व माऊसने करुन दाखविली आहे. आता जग जणू प्रत्येकाच्या खिशातच सामावलंय, ते म्हणजे स्मार्टफोनच्या माध्यमातून. झपाट्याने होत असलेली तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती आपल्या कल्पनातीत आहे. हे नक्कीच. केवळ अन्न, वस्त्र, निवारा या तीन जीवनावश्यक वस्तूंच्या मागे धावणारा समाज आता स्मार्टफोनच्या माध्यमातून इंटरनेटसोबत धावतांना दिसतोय. यामध्ये फायदे बरेच आहेत, पण कैक पटीने तोटेही आहेत, हे आपण लक्षात घ्यायला हवे. आणि त्यादृष्टीने सावधगिरी बाळगणेही तितकेच आवश्यक आहे. आजच्या युगाला इंटरनेटचेच युग म्हणावे लागेल. कोरोनाकाळापासून तर पाच वर्षांच्या मुलापासून सत्तरीच्या आजोबांपर्यत सर्वांसाठीच इंटरनेट आणि मोबाईल आवश्यक झाले आहे. 

Sextortion Vidarbhadoot Buldhana 2


इंटरनेटचे स्वरूप जसे हळू-हळू विस्तारत गेले, त्याच्या कित्तेक पटीने जास्त प्रमाणात ऑनलाईन गुन्हेगारी वाढायला लागली आहे. विस्तारित गेली आहे. पोलिसांची सायबर शाखा ऑनलाईन गुन्हे रोखण्यासाठी सवोर्तोपरी प्रयत्न करत आहे, असे असतानाही नवनवीन मार्ग शोधून सर्वसामान्यांची आर्थिक फ सवणूक करण्यात ऑनलाईन गुन्हेगार माहीर होत आहेत. हे सुद्धा वास्तव आहे.  या ऑनलाईन फ सवणुकीला केवळ सर्वसामान्य नागरिकच नाही तर उच्चपदांवरील नोकरदार, व्यावसायिक, डॉक्टर, वकील, इंजिनियर या सारखे प्रतिष्ठित नागरिक सुद्धा बळी पडत आहेत. फसविल्या जात आहे. यामध्ये होणारी आर्थिक फसवणूक ही एकदा झाली की त्यापासून माणूस सावध व्हायचा व इतरांनाही सावध करायचा. त्यामुळे काही प्रमाणात का होईन अशा ऑनलाईन फसवणूकीला बळी पडणारांची संख्या मधल्या काळात कमी व्हायला लागली आहे; परंतु अलिकडच्या काळात सायबर गुन्हेगारांनी काढलेला फसवणूकीचा मार्ग मात्र अत्यंत घातक आणि महाभयंकर असा  आहे. या प्रकाराला एक प्रकारे ''हाक ना बोंब असेही म्हणता येईल.

हा नवा प्रकार फार भयावह, आणि भयंकर असा आहे. जो कुणी या प्रकाराला बळी पडतो तो आपण फसविल्या गेलो आहोत, असे राजरोसपणे सांगुही शकत नाही. या फसवणुकीने कित्त्येक जण तर जीवनही संपवतात, हे धक्कादायक पण वास्तव आहे. एकेकाळी गुन्हेगारांकडून 'एक्सटॉर्शनÓची मागणी केली जायची आता या सायबर गुन्हेगारांकडून फसवणुकीच्या उद्येशाने  'सेक्सटॉर्शनÓची मागणी केली जात आहे. आणि याच सायबर गुन्हेगारांनी 'सेक्सटॉर्शनÓहा शब्द जन्माला घातला आहे.  अलीकडच्या काळात ऑनलाईन लैंगिक छळाचे प्रमाण वाढले आहे त्यातूनच हा शब्द निर्माण झाला आहे. सेक्सटॉर्शन म्हणजे खंडणी तसाच लैंगिक खंडणी म्हणजे सेक्सटॉर्शन. सोशल मीडियाच्या फेसबुक अकाउंटचा यासाठी वापर केला जातो. आणि यामध्ये जो बळी ठरतो, तो मात्र मुक्याचा मार सहन करीत असतो, कारण अशा काही घटना विदर्भात आणि प्रामुख्याने अकोला-अमरावतीमध्ये ब:याच प्रमाणात उघड होत आहेत, अगदी ग्रामिण भागामध्येसुद्धा अशा घडना घडायला लागल्या आहे; परंतु अशा घटनांची पोलीस दप्तरी गुन्हा दाखल होण्याची संख्या नसल्याबरोबरीत आहे. कारण शेवटी अशा प्रकरणांमध्ये बदणामीची मोठी भिती अत्याचारग्रस्तांना असते. या फसवणूकीमध्ये शारिरीक अत्याचार होतोच असे आजीबात नाही. परंतु त्या आधारे 'आर्थिक तोडीÓ मात्र मोठ्या प्रमाणात होत आहेत. यामध्ये विशेषता: पुरुषांना गंडविल्याची प्रकरण मोठी आहेत.

आता हे गुन्हेगार सावज कशा प्रकारे हेरतात, तर त्यासाठी अत्यंत सोपी पद्धत आहे. सोशल मीडियाच्या फेसबुक अकाउंटवरून तुम्हाला एका अनोळखी मुलीची फ्रें ड रिक्वेस्ट येते. ती फ्रेंड रिक्वेस्ट माहिती न घेता स्वीकारली जाते. नंतर मेसेंजरच्या माध्यमतातून चॅटिंग केली जाते. त्यानंतर एकमेकांचे व्हाट्सएप नंबर घेऊन व्हाट्सएपवर चॅटिंग होते. चॅटिंग बरोबरच व्हिडीओ कॉल, व्हाट्सएप कॉल करण्यास सुरुवात होते. समोरची व्यक्ती अंगप्रदर्शन करून अश£ील हावभाव करते. समोरच्या व्यक्तीला मोहात अडकवले जाते. त्याला प्रोत्साहन देऊन त्याच्याकडून विवस्त्र अश£ील बाबी करून घेतल्या जातात. विशेष म्हणजे या सर्वांचे व्हिडीओ ऑन स्क्रीन रेकॉर्ड केले जाते. त्यानंतर काही दिवसांच्या  फरकाने तुम्हाला मेसेज, फोन कॉल करून पैशांची मागणी केली जाते. पैसे न दिल्यास तुमचा व्हिडीओ व्हायरल करून बदनाम करण्याची धमकी दिली जाते. अशा प्रकारे लैंगिक खंडणी म्हणजेच'सेक्सटॉर्शनÓची मागणी केली जाते. यात प्रामुख्याने कॉलेजमधील विद्यार्थी व समाजातील प्रतिष्ठित नागरिकांना टार्गेट केले जाते. अकोल्यात घडलेल्या काही घटना अगदी याच पद्धतीने घडल्या आहेत. आणि यामध्ये फसविल्या गेलेले व्यक्ती लाखो रुपयांनी लुबाडल्या गेले आहेत. त्यामुळे आपण सावध होणे, राहणे हेच एक औषध यावर ठरु शकते.

Sextortion Vidarbhadoot Buldhana 3


यामध्ये सर्वात मोठे शस्त्र गुन्हेगारांच्या हाती असते, आणि ते म्हणजे 'बदणामीÓ. आणि याच बदणामीला घाबरुन अनेक जण या सायबर गुन्हेगारांना हवी ती रक्कम देतात. ब:याचदा रक्कम देऊनही पुन्हा मागणी केली जाते. त्यामुळे फसवले गेलेले मानसिक तणावात येतात त्यातून ते आत्महत्येचा मार्गही स्वीकारतात. या प्रकाराला बळी पडून काही जणांनी आत्महत्या केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. सेक्सटॉर्शन हा पैसे कमावण्याचा नवा मार्ग सायबर गुन्हेगारांनी शोधून काढला आहे. या सायबर गुन्हेगारांना पकडणे सायबर पोलिसांसाठी मोठे आव्हान बनले आहे. कारण हे गुन्हेगार राज्याबाहेर किंवा देशाबाहेरचेही असू शकतात. या सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकू नये यासाठी सोशल मीडियाचा वापर करताना सावधगिरी बाळगायला हवी. कोणाचीही अनोळखी फ्रें ड रिक्वेस्ट स्वीकारू नये. आपली फ्रें ड लिस्ट आणि फ ॉलोअर्स वाढवण्याचा अट्टाहास आपले आर्थिक व मानसिक नुकसान करू शकतो. आजची तरुणाई सोशल मीडियाची मोठी फॅन बनली आहे. इंटरनेट, मोबाईल ही तरुणांची जीवनावश्यक गरज बनली आहे. मात्र याचा वापर समाजहिताच्या गोष्टी जोपासण्यासाठी झाला तरच उत्तम नाहीतर तुमची एक चूक तुमच्या जिवावरही बेतू शकते. म्हणूनच प्रत्येकाने सावधगिरी बाळगून सोशल मीडियाचा वापर करावा. 

शेवटी काय तर मोह आणि मोहातून उत्पन्न होणारी कामलालसा यामधून माणसाच्या आयुष्याचा शेवटही होऊ शकते, हे या नव्या सायबर गुन्हेगारांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे या प्रकारपासून प्रत्येकाने आपले संरक्षण करणे आवश्यक आहे. सोशल मिडीया हे मायाजाळ आहे. कोण कुठला, कसा याची कोणतीही शहानिशा या ठिकाणी केली जात नाही. आणि यामधून फसवणूक होत असते, त्यामुळे सर्वांनीच 'सेक्सटॉर्शÓपासून वाचणे आवश्यक आहे.कारण ऑनलाईन फसवणूकीचा सेक्सटॉर्शन हा नवा मार्ग आहे, यामध्ये कोणतीही शंका नाही. 

संजय निकस पाटील, लेखक हे सा. विदर्भदूत व सा. शिवप्रतिष्ठान चे मुख्य संपादक आहेत. मो. क्र. ९४०५६६५५९९

Post a Comment

0 Comments