Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभा महिला आघाडीच्या वतीने महिला दिन साजरा

 


बुलडाणा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडी जिल्हा बुलडाणा (उत्तर) आणि तेली समाज महिला मंडळ मलकापूर च्या वतीने 12/3/2022 शनिवार रोजी संताजी भवन  काळीपुरा मलकापूर येथे जागतिक महिलादिन व स्नेहमिलन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.सुमनताई मुरलीधर आकोटकर व विशेष मार्गदर्शिका सौ. तेजल शरद काळे (मोताळा),प्रमुख उपस्थितीश्री  रमेशजी आकोटकर सर (विभागीय सचिव मप्रांतैम)

श्री योगेश मंडवाले

(मप्रांतैम विभागीय सदस्य)

श्री मिलिंद डवले

(मप्रांतैम विभागीय सदस्य),

श्री तुषार काचकुरे

(युवा जिल्हाध्यक्ष मप्रांतैम)

सौ.सुलोचनाताई सुलताने

(महिला जिल्हाध्यक्षा उ.महिला आघाडी बुलडाणा)

श्रीमती विमल ताई चोपडे (कार्याध्यक्षा जिल्हा महिला आघाडी बुलडाणा)

सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते संताजी महाराजांचे पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

त्यानंतर दिवंगत भारतरत्न लतादीदी मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

मान्यवरांचे स्वागत शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले उपस्थितांना मार्गदर्शन करतांना डाॅ. तेजल काळे यांनी आरोग्य आणि शारीरिक सुदृढता राखण्यासाठी प्रसन्न आणि आनंदी राहण्याचे अनेक उपाय सुचविले.

त्यानंतर मान्यवरांचे मार्गदर्शन पार पडले .

पुढे कार्यक्रमा दरम्यान विविध मनोरंजक खेळ, जनजागृती विषयक भारुड आणि सुसंवाद साधून सामाजिक ऐक्य निर्माण करणारे उपक्रम सादर करण्यात आले. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या जिल्हा महिला आघाडीच्या सचिव सौ. शारदाताई गलवाडे यांना सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी  अकोला विभागीय सचिव रमेश आकोटकर सर  यांच्यातर्फे घे भरारी हा पुरस्कार शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले त्याचप्रमाणे कु.अपर्णा भिसे यांना ध्येयपुर्ती या पुरस्काराने सन्मानचिन्ह देऊन व त्यांच्या आई श्रीमती भिसे ताई यांना शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. कोरोना काळामध्ये जीवाची पर्वा न करता रुग्णसेवेचे अविरत कार्य करणाऱ्या कर्मयोद्धा आशा वर्कर सौ. निलिमाताई निलेश उखर्डे तसेच अंगणवाडी सेविकासौ .मीनाताई बाळकृष्‍ण भोंबे यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. 

   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शारदाताई गलवाडे खामगाव (सचिव जिल्हा महिला आघाडी बुलढाणा) आणि सौ.वृषालीताई दैवे मलकापूर यांनी तर प्रास्ताविक जिल्हा  महिला आघाडी प्रसिद्धी प्रमुख प्रा.सौ. स्वातीताई लोखंडे यांनी केले.  तसेच सौ. प्रमिलाताई जामोदे आणि सौ. मंगलाताई आकोटकर यांनी स्वागतीत गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

या स्नेहमिलन कार्यक्रमासाठी संपुर्ण जिल्हाभरातून प्रांतिक तैलिक महिला आघाडी सदस्य व पदाधिकारी तालुका (खामगाव, शेगाव, नांदुरा , जळगाव, संग्रामपूर, मलकापूर) उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ. ज्योतीताई नायसे यांनी केले. कार्यक्रमाला सौ. कल्पना डवले, सौ. मीना डवले,सौ. मीना जावरे ,सौ. सुमन जामोदे ,सौ.सुमित्रा बोराखडे ,सौ.सुनीता डवले,सौ.सिंधु जवळकर , सौ.नंदा पांडव, सौ. मंजू जावरे सौ. नेहा मेहसरे, सौ.दुर्गा काचकुटे, सौ सविता डवले , सौ. पूनम जामोदे, सौ. शीतल डवले  आधी समाजातील महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदीप भाऊ जामोदे, विनोद आकोटकर, पिंटू भाऊ डवले, रामेश्वर भाऊ गोरले भाऊ गोरले, अंकुश भाऊ वानखेडे, प्रविण उमक, सुरज भाऊ मेहसरे आधी समाज बांधवांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments