Ticker

6/recent/ticker-posts

प्रशासनातील एक उर्जेचा शाश्वत झरा: सैपन नदाफ तहसिलदार

Tahasildar Naddaf Lonar Vidarbhadoot Buldhana 1


... मित्रांनो, समाजात अनेक बहुआयामी व्यक्तिमत्व असे आहेत की त्यांनी टाकीचे घाव सोसलेले आहेत.संघर्षाच्या आगीत तावून सलाखून निघालेले आहेत.काटेरी पाऊलवाटा तूडवत यशाचा हिमालय सर केला आहे.म्हणून असे व्यक्तिमत्व इतरांना प्रेरणादायक ठरतं असतात.माणसाला परिस्थिती घडवत असते.मुळात माणसांच्या संघर्षाचा काळ हा त्याचा खरा मार्गदर्शक असतो.कारण ती वेळ माणसाला संकटात संघर्ष करायला,लढायला शिकवते.यातून निर्माण झालेल व्यक्तिमत्व हे ख-या अर्थाने समाजाला दिशादर्शक ठरते.एखाद्या व्यक्तीने आपले पूर्ण कौशल्य वापरून काम कसे करावे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सैपन नदाफ तहसीलदार लोणार आहेत.प्रशासनातील एक उर्जेचा शाश्वत झरा असणा-या   व्यक्तीच्या सहवासात राहिल्याने आपणही असेच घडत जावे अशी प्रेरणा आपल्याला मिळते. स्व:कर्तृत्वाने उभे राहुन विविध गुणाचा संगम असणा-या तहसीलदार सैपन नदाफ आज बुलढाणा जिल्हामधील जगातील दुस-या क्रंमाकाचे सरोवर असलेल्या लोणार तालुक्याच्या ठिकानी तालूका दंडाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.सैपन नदाफ हे सोलापुर जिल्हातील अक्कलकोट तालुक्यामधिल दहिटणे गांवात माता सगिराबी व पिता बाबुलालजी यांच्या कुटुंबात दि.5 जुलै 1986 रोजी सैपन नदाफ चा जन्म झाला.

Tahasildar Naddaf Lonar Vidarbhadoot Buldhana 2


वडिलांच्या निधनानंतर प्रतिकूल परिस्थितिचा डोंगर डोक्यावर घेऊन हिमालय सर करण्यासाठी निघालेल्या सैपन नदाफ यांना अनेक खडतर पाऊलवाटा तूडवत यशाचा मार्ग शोधावा लागला.सुखी माणसाचा सदरा कुणाला शोधूनही सापडत नाही म्हणतात़ पण, म्हणून काही सुखाचा शोध घेणे थांबत नाही़ ज्यांना विश्वास असतो आपल्या कर्तृत्वावर अन् ज्यांच्यात धमक असते जग बदलण्याची ते घालतात घाव अंधारलेल्या रात्रीच्या माथ्यावर आणि ओढून आणतात यशाची मंजुळ पहाट. प्रतिकूलतेच्या चक्रव्यूहातूनही शिक्षणाचा मंगलकलश खेचून आणणा-या या सैपन नदाफ यांचे प्राथमिक शिक्षण हे दहिटणे गांवात घेतले.तसं सैपन नदाफ यांच्या आईचे वडील म्हणजे त्यांचे आजोबा माजी मुख्याध्यापक होते व गावातचं मावशी सुध्दा त्यावेळी अंगणवाडीवर सेविका होत्या तर मामाचे सुध्दा डीएड-बीएड झालेले असल्याने आजोबा व मामा ईस्माइल नदाफ गावात मुलांचे ट्युशन घेत असल्याने सैपन नदाफ यांना शाळेत शिक्षणाबद्ल आवड निर्माण झालेली होती.अल्पसंख्यांन समाज मुख्यत्वेकरुन नोकरीऐवजी पारंपरिक व्यवसायांमध्ये आढळून येतो.त्यातदेखील छोट्या अथवा कमी भांडवलाच्या व्यवसायात या समाजाची गुंतवणूक अधिक असते.प्रशासकीय सेवा अथवा शैक्षणिक सेवांमध्ये हा समाज अगदीच अभावाने आढळतो.

मात्र  सैपन नदाफ यांच्या कोवळ्यावयातच घरातील नातेऋ णातून शिक्षणाचे सुसंस्कार मनावर प्रतिबिंबित झालेले होते. म्हणून शाळेला कधीच दांडी मारली नाही.त्यामुळे शाळेत अत्यंत शिस्तप्रिय वागणूकीतून ध्येय गाठण्यासाठी अभ्यासात मग्न राहत होते.पाचव्या वर्गात असताना नवोदयच्या परिक्षेत तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावून कौतूकास पात्र झाले.त्यामुळे बारावीपर्यंत मोफत शिक्षणासाठी निवड झाली होती. बारावीत सोलापुर मध्ये असताना सैपन नदाफ यांचे वडील बाबुलालजी नदाफ यांचे निधन झाले.त्यामुळे सैपन नदाफ यांच्या जीवनातील उद्याची मंजूळ पहाट पाहण्याच्या अगोदरच,डोक्यावरील छत्रछायेचा सुर्य मावळा होता.त्यामुळे अंधारलेल्या काळोखात यशाची वाट दिसेनासी झाली होती.पण अंधारलेल्या काळोखात चाचपडत बसण्यापेक्षा आई सगिराबी नदाफ चा फाटका पदर हाताशी धरुन उद्याच्या सुर्याला शोधण्यासाठी हिमालयाकडे झेप घेतली.डोक्यावर प्रतिकूल परिस्थितीचा डोंगर असल्याने वैद्यकीय क्षेत्रात आणि इंजीनियरिंग मध्ये उतरण्याची बौध्दिक क्षमता असूनही बघितलेलं स्वप्न पुर्ण होऊ शकलं नाही. परिस्थिती कितीही बिकट असली तरी शून्यातून विश्व करण्यासाठी बीएससीला प्रथम व द्वितीय वर्षात असताना घरात पैसेची व खाण्यापिण्याची चणचण भासू नये म्हणून परिसरातील विद्याथ्र्यांना ट्युशनचे धडे देऊ लागले.मात्र मन स्वस्थ बसूदेत नव्हते अहोरात्र अभ्यासात मग्न राहुन एमपीएससीच्या अभ्यास क्रंमाकासाठी मन वळवले होते.मामाचा कुटुंबाला आधार असलातरी बहिनीचे लग्न डोळ्यासमोर उभं होते.आई,दोन भाऊ,या सा-यांचा भार डोक्यावर होता.म्हणून आपण शिकलचं पाहिजेत.कुढेतरी पारटाईम  नोकरीच्या माध्यामातून कुटुंबाला आधार झाला पाहीजे या हेतूने पुन्हा अभ्यात स्वत:ला झोकून दिले होते.एक दिवस दैनिक वृत्तपत्राचे वाचन करत असताना एसआरपीएफ भरतीची जाहीरात वाचण्यात आली आणि लगेच तयारी करुन हजारो विद्याथ्र्यांच्या रेसमध्ये सहभागी होऊन धावण्याला सुरवात केली.शरीराला कुठलाही धावण्याच्या सराव नव्हता तरी विद्याथ्र्यांमध्ये बाजी मारुन  क्रमांक पटकावला होता.त्यामुळे परिक्षेत उत्तीर्ण होऊन पोलीस कॉन्स्टेबल म्हणून एसआरपीएफ मध्ये नोकरीला लागले.या यशामागे खऱ्याअर्थाने मामानी पडत्या काळात कुटुंबाचा भार डोक्यावर घेतलेला होता म्हणून सैपन नदाफ यांच्या जीवनात ते आधारस्तंभ बनलेले होते म्हणून मामा ईस्माइल नदाफ वंदनीयचं होते.वडील बाबुलालजी प्रेरणास्थान होतेचं,पण वडीलांची ईच्छा होती की आपल्या मुलांनी खूप शिकाव आणि क्लासवन अधिकारी व्हावं. त्यामुळे या यशाला नवोदय विद्यालयातून जीवनाला कलाटनी मिळालेली होती. 26/11 च्या हल्ल्याच्यावेळी मुंबईत राज्य राखीव दलासोबत तैनात करण्यात आले होते.त्यावेळी सोबतचा मित्र हल्ल्यात शहिद झाला होता.पण हिम्मत न हारता दशतवादी संघटनेसोबत आपणला लढायचं म्हणून पुर्ण तयारी केलेली होती. अन् त्याच दिवसापासून अंगात लढण्यांची ताकत निर्माण झाली होती.मनात क्लासवन अधिकारी होण्याच स्वप्न रंगत होत,मन स्वस्थ बसूदेत नव्हते.पुढे राज्य गुप्तवार्ता विभागाची सरळ सेवा अधिकारी पदाची भरती निघाली म्हणून वरिष्ठ गुप्तवार्ता विभागात अधिकारी पदी निवड झाली.

आणि नक्षलवादी विभाग असलेल्या चंद्रपुर जिल्हात नेमणूक करण्यात आली.अशा संवेदनशील भागात नोकरी करणं म्हणजे मौत का कुआंच होतं.पण  लहानपणापासूनच प्रतिकूल परिस्थितीचे चटके सोसल्यामुळे अंगात लढण्यांच बळ निर्माण झालेलं होत.म्हणून देशसेवेसाठी शहीद झालो तरी चालेल पण हार मानायची नाही असा मनावर घट विचार ठासलेला होता.नक्षलवादी भागात ड्युटी करत असताना एमपीएससीच्या परिक्षेची जाहीरात निघाली होती त्यामुळे एमपिएससीच्या अभ्यास क्रमासाठी अहोरात्र मेहनत घेऊन राज्यातून 24 व्या मिरीट क्रंमाक पटकावला आणि यशाला अखेर कवेत घेतलेचं,त्यामुळे जिद्द,चिकाटी आत्मविश्वासाच्या बळावर सैपन नदाफ यांनी हिमालयाला गवसणी घालत नायब तहसीलदार झाले.अमरावती जिल्हातील अंजनगाव सुर्जी,चांदूरबाजार,चिखलदरा,आदि ठिकानी महसूल विभागात सेवा दिली.सेवा देत असताना अनेक अनुभवातून कणखरपणा अंगीकृत झाला.हा कणखरपणा पाहुन प्रशासनाने प्रभारी तहसीलदारपदाची धुरा सांभाळ्यांची संधी मिळाली.यानंतर पदोन्नती होऊन तहसिलदार होण्याची संधी चालून आली.त्यामुळे बुलढाणा जिल्हामधील जगातील दुस-या क्रंमाकाचे सरोवर असलेल्या लोणार तालुक्याच्या ठिकानी महसूल विभागात सैपन नदाफ आज तहसिलदार पदावर कार्यरत आहेत.अशा ठिकानी आपले कर्तुत्व निभावत असताना  हिंदू-मुस्लिम ऐकोपा टिकून ठेवण्यासाठी सामाजिक एकात्मेचा संदेश देत असतात.म्हणून सैपन नदाफ यांच्याकडे ऐक्याचे प्रतिक म्हणून पाहिल्या जाते.आपल्या कार्यकर्तुत्वातून सामाजिक बांधिलकी जोपासत रेती माफ ीया सारख्या गुन्हेगारीवर बारकाईने नजर ठेऊन वचक निर्माण केला आहे.कायद्यात राहाल तर फायदात राहाल हा संदेश देत गुन्हेगारी काबूत केली आहे.अनेक वेळा वेळप्रसंगी एकट्याने मोटरसाइकिलवर रेतीचे ट्रक अडवून रेती माफ ीयांना धडा शिकवला आहे.

महसूल विभागात एक शिस्तप्रिय, धाडसी, कणखरपणा असलेला संवेदनशील मनाचा माणूस म्हणून सैपन नदाफ यांच्याकडे पाहिले जाते.असं परिवर्तनशील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व सैपन नदाफ मध्ये असल्यामुळे, 'बोले तैसा चालेÓ, त्याची वंदावी पाऊले या उक्तीला साजेसे व्यक्तिमत्त्व महसूल विभागात उठवून दिसत आहे.कामाला महत्व देऊन ते पुर्ण करण्यासाठी धडपणारा अधिकारी म्हणून ते पदाधिका-यांसह प्रशासनामध्येही परिचित आहेत.तालुका दंडाधिकारी पदावर असल्यामुळे प्रेम आणि पदासोबत समरस होण्याची त्यांची शैली ही कौतुकास्पद आहे.प्रशासकीय अधिकारी प्रशासनाचा मुख्य कणा असतो.प्रथम प्रशासकीय कामातील दफ्तरदिरंगाई, कर्मचारी व इतर लोकांची कामचलाउ वृत्ती यावर नियंत्रण आणून प्रशासन शिस्तप्रिय व  वेगवान वेगवान बनण्यासाठी, कोणत्याही व्यक्तीचे काम हे उद्या करण्यापेक्षा आजच करा,आज करण्यापेक्षा आताच करा,असे आपल्या कर्मचाऱ्यांना शिस्तीचे धडे देऊन कामाला प्राधान्य देऊन हमखास पुर्ण करणारा कर्तव्याप्रति निष्ठा असणारा अधिकारी म्हणून सैपन नदाफ तहसिलदार लोणार यांची ओळख आहे.असं कर्तुत्ववान बहुआयामी व्यक्तिमत्व आजच्या तरुणाई साठी एक उर्जेचा शाश्वत झरा प्रेरणा देणारा ठरतं.कोरोना सारख्या महामारीच्या संकटामध्ये गेल्या दोन वर्षापासुन आजची तरुणाई बहुसंख्यने मोबाइलच्या विळख्यात अडकलेली दिसून येत असल्याने या तरुणाईला उर्जात्मक करण्यासाठी कत्र्तव्यनिष्ठ, शिस्तप्रिय, तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी सैपन नदाफ संदेश देतात की,मित्रांनो...!

जी व्यक्ती महाप्रचंड संकटांनाही जुमानत नाहीत ती असतात आत्मशक्तिंनी  महाप्रतापी झालेली माणसं! आपल्या आत्मविश्वासाच्या ,धाडसाच्या आणि जिद्दीच्या सामथ्र्यांने त्या व्यक्तींची शस्त्रे-वस्त्रे तयार असतात. त्यांना 'वेळ पाहूनी खेळ मांडणेÓ नामंजूर असते!!

ही माणसं जीवनाचा लढा देतच मोठी होतात......

'यशस्वी होण्यासाठी मनातील न्यूनगंड बाजूला कराÓ

व्यक्तिमत्वाचे विकासाचे पैलू अनेक असले तरी कुटुंब,शाळा, महाविद्यालय, शेजारी, मैत्रीतून व्यक्तिमत्वाची जडण- घडण होते.जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वत:चा शोध घ्या आणि मनातील न्यूनगंड बाजूला करा,जीवनात कोणताही माणूस कधीच कमी नसतो,त्यामुळे प्रत्येकाने मोठी स्वप्न पाहिली पाहिजेत.मोठी स्वप्न पाहणारी माणसे मोठी होत असतात.ध्येय प्राप्तीसाठी कारणांचा,समस्यांचा बाऊ करु नका प्रत्येक काम बुद्धीच्या कसोटीवर तपासून पहा.आपल्याला हे जमणार नाही,हा न्यूनगंड बाजूला फेकून द्या.

'मनाच्या विचारांकडे आपली उर्जा प्रभावित होत असते.

प्रत्येकाला आयुष्यात ताणतणाव हा असतोच आणि कित्येकंदा फ ार गंभीर प्रसंगातून जावं लागतं,त्यामुळे आलेल्या आपत्तीचा मनाला इतका धक्का बसतो की ते संकट टळले तरी ती व्यक्ती सतत धास्तावलेली असते की असे संकट पुन्हा येणार तर नाही याने. परंतु एकदा येणाऱ्या संकटाची पुन्हा पुनरावृत्ती प्रत्येक वेळी होते असे नाही. पण मनावर त्याची सावली मात्र सतत पडलेली असते. परंतु ही अवस्था बदलण फ ार आवश्यक आहे त्यासाठी मनातील भीती काढून मन:स्थिती स्थिर करणं फार गरजेच आहे. मनात येणा-या या गोष्टीना बाजूला करणे आवश्यक होते.पण ते लिहिण्या,बोलण्या इतकं सोप नाही हे जरि खरे असले तरी प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. आपल्याला जी गोष्ट हवी ती सुखाची आहे, त्याच गोष्टीं कडे लक्ष वळविण्याचा सराव करावा किंवा मंत्रोच्चाराचा आधार घ्यावा. कारण यातील एक महत्वाचे तत्वं म्हणजे आपले लक्ष,आपले विचार,आपले मन जिथ जातं तिकडेच आपली उर्जा आणि शक्ती प्रभावित होत असते.

अशा कर्तुत्ववान,धाडशी, प्रभावशाली, बहुआयामी व्यक्तिमत्व आणि प्रशासनातील एक उर्जेचा शाश्वत झरा असलेल्या आदरणीय सैपन नदाफ तहसीलदार साहेबांच्या कार्यकर्तुत्वाला त्रिवार सलाम...!

Post a Comment

0 Comments