Ticker

6/recent/ticker-posts

तडेगाव येथे समृद्धी महामार्गा लगत खडकपूर्णा नदीपात्रातुन अवैध रेती उत्खननाची चौकशीची मागणी

 


अवैध रेती उत्खननाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित  करण्याची मागणी

सिंदखेड राजा -  मनोज जाधव -तालुक्यातील   तडेगाव येथे समृद्धी महामार्ग लगत खडकपूर्णा नदीपात्रातून  पंधराशे ते सोळाशे ब्रास अवैध रेतीचा उपसा झालेला असून या ठिकाणी सिंदखेडराजाचे तहसीलदार  स्वतः तेथे जाऊन सुद्धा त्यांनी  बघुन सुद्धा आजरोजी पर्यंत कुठलीही कारवाई केलेली नाही, महसूल विभाग व वन विभागाच्या आदेशानुसार कुठल्याही पुलाच्या 600 मीटर किंवा 2000 फूटच्या आत रेतीचा उपसा करता येत नाही व परंतु तिथे समृद्धी महामार्गाचा फुल उभारणे चालू आहे तिथेच अवैधरित्या रात्रीच्या वेळी रेती उपसा होत आहे याकडे जाणूनबुजून तहसीलदार यांचे दुर्लक्ष होतांना दिसत आहे  तेथे जाऊन सुद्धा त्यांनी तिकडे दुर्लक्ष केलेले आहे शासनाच्या नियमाची पायमल्ली करत असून लाखो रुपयांचा महसूल बुडत  आहे.

सिंदखेडराजा तहसीलदार यांचा  अवैध रेती उपसा करणाऱ्यांशी  अर्थ पूर्ण संबंध होत असल्याने याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष देणे गरजेचे आहे, मागील वर्षी सुद्धा येथे दोन हजार ते अडीच हजार ब्रास इतके अवैध उत्खनन झालेले होते तेव्हा सुद्धा तहसीलदार यांनी काहीही कारवाई केलेली नाही ,इतके मोठे उत्खनन होऊन सुद्धा त्यांनी कुठल्याही अधिकाऱ्याला पंचनामा करण्याचा आदेश सुद्धा दिलेला नाही.अवैध  रेती उपसा करणाऱ्यांचे व तहसीलदार यांचे अर्थपूर्ण संबंध आहे त्यामुळे सिंदखेडराजा तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी अवैध उत्खनन सुरू असून सुद्धा कुठेही ना तक्रार ना कारवाई ना आजपर्यंत कुठलाच पंचनामा झालेला नाही तरी तात्काळ सिंदखेडराजा तहसीलदार हे अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांना पाठीशी घालत असल्याने सदर ठिकाणची चौकशी करून दोषींवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Post a Comment

0 Comments