Ticker

6/recent/ticker-posts

एक प्रज्वलित व्यक्तिमत्त्व; प्रदीप ठाकुर, पोलीस निरीक्षक लोणार

एक प्रज्वलित व्यक्तिमत्त्व; प्रदीप ठाकुर, पोलीस निरीक्षक लोणार

PI Pradip Thakur Lonar Birthday Spesial.Vidarbhadoot Buldhana 2 April 2022 2


'सदा लोकहिता सत्त्क दीपा स्नोत्तमा

... सदैव लोकहित करण्यात मग्न असतात ते दीपा प्रमाणेच प्रज्वलित असतात.या उक्तीप्रमाणेच पोलीस विभागात आयुष्यातला प्रत्येक क्षण लोकहितासाठी सज्जनांचे रक्षणकरत आणि दुर्जनांचे निर्दालन करत कर्तव्यात कोणताही कसूर न ठेवता उत्तमरीत्या प्रशासनात एकनिष्ठ राहून दीपा प्रमाणेच प्रज्वलित असणारे व्यक्तिमत्व, नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या निसर्गसंपन्न लोणार तालुक्यात पोलीस ठाण्यात उत्तम कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकुर यांचे कार्य अनुकरणीय आहे.आज पोलीस निरीक्षक प्रदिप ठाकुर यांचे अभिष्टचिंतन! असल्यामुळे मलाही त्यांचा प्रेरक प्रवास लिहण्याचा योगा-योग जूळून आला.मी प्रशासनातील असंख्य अधिकाऱ्यांचा प्रेरणादायक प्रवास आजच्या तरुणाईला संघर्षातून गरुडझेप घेण्यासाठी, मनोबल,आत्मविश्वास, उर्जावान, करण्यासाठी सातत्याने नि:स्वार्थपणे लिहण्यांचा प्रर्यत्न करत असतो.त्यामुळे अशा कर्तुत्ववान,प्रज्वलित व्यक्तिमत्वचा प्रेरक प्रवास आपणासाठी लाभदायक ठरणारं आहे.

मातीला दाण्याची,दाण्याला श्रमाची तर श्रमाला घामाची भाषा समजते.आजच्या तरुणाईला जीवनस्वप्न फुलवायचे असेल तर घाम गाळावाच लागेल.उद्याचा उष:काल पाहायचा असेल तर पोलीस विभागातील एक प्रज्वलित व्यक्तिमत्व असलेलं पोलीस निरीक्षक प्रदिप ठाकुर यांचा प्रेरक प्रवास तूमच्या मनातील वाती पेटवल्या शिवाय राहणार नाहीत. जीवनात ज्ञान, बुद्धी,आत्मविश्वास, प्रामाणिकपणा आणि कौशल्य असल्याशिवाय माणसाला यश मिळत नाही.उत्कर्ष आणि उन्नती ही दोन यशाची चाके आहेत.अर्थपूर्ण जीवन जगणे हीच खरी जगण्याची कला आहे.आपले जीवन हे अत्यंत संघर्षमय आहे.अगदी जन्माला आल्यापासून जीवनात संघर्ष करावा लागतो.जेवढा कढीण संघर्ष असतो तितकाच शानदार विजय असतो.क्षेत्र कोणतेही असो ध्येयाने संघर्ष करा यश तुम्हाला नक्कीच मिळेल. ध्येय जर स्पष्ट असेल तर योग्य पावले पडतात आणि घटना घडतात. उपरोक्त संघर्षविषयीचा एवढा शब्दप्रपंच यासाठीच केला आहे की, पोलीस निरीक्षक प्रदिप ठाकुर यांचा सुद्धा शिक्षणात खडतर संघर्षप्रवासातून असामान्य जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर पोलीस निरीक्षक पदावर यशाचे शिखर मिळविता आले.

महाराष्ट्रराज्याची उपराजधानी असलेल्या नागपुर शहरातील जैताळा याठिकानी पिता खंडू ठाकुर व माता सुशीलाबाई खंडू ठाकुर या दांपत्यांच्या कुटुंबात दि.2 एप्रिल 1969 रोजी पोलीस निरीक्षक प्रदिप ठाकुर यांचा जन्म झाला.तसं वडीलांच मुळगांव जळगांव जिल्हा.वडिल खंडू ठाकुर एसआरपीएफ मध्ये नौकरीला होते.त्यामुळे प्रदिप ठाकुर यांच्यावर सुसंस्कृत संस्काराची जडण-घडण झाली होती.नौकरीनिमित्ताने वडिल खंडू ठाकुर यांना या शहरातून त्या शहरात प्रवास करावा लागला म्हणून प्रदिप ठाकुर सरांचे शिक्षण मुळगांव असलेल्या जळगांव मध्ये  ग्रामीण भागात शिक्षणाचे धडे गिरवावे लागले.वर्ग चौथीमध्ये असतानी स्कॉलरशिप साठी निवड झाली.त्यामुळे पाचवी ते दहावी पर्यत धुळे जिल्हातील छत्रपती कॉलेजमध्ये शिक्षणाचे धडे गिरवले.आई वडिलाची ईच्छा होती,प्रदिपने इंजीनियर होऊन मोठ व्हावं पण प्रदिप ठाकुर सरांना खेळामध्ये प्रचंड आवड असल्याने सातत्याने खेळाच्या मैदानावर क्रिकेट, हॉकी मैचमध्ये वेळ जात असल्याने अभ्यासात दुर्लक्ष होत असल्याने बारावीत असताना मार्क मिळाले नाही म्हणून इंजीनियरिंगला जाता आले नाही.त्यामुळे आईवडिलांनी रंगविलेल्या स्वप्नाची भ्रम निराशा झाली.मात्र न खचता न डगमता इलेक्ट्रॉनिक मध्ये आवड असल्याने मित्राच्या संगतीने प्रशिक्षण पुर्ण केले. आयुष्यात पुढे जाण्यासाठी गरुडासारखी उत्तुंग भरारी घेऊन आपल्याला नविन आव्हाने स्वीकारण्याची आवश्यकता असते.आपण नेहमी विकसनशील व प्रगतशील राहण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आकाशात उंच गरुडझेप घ्यायची असेल तर स्वत:च्या पंखांनी उडायची तयारी ठेवावी लागेल हे उद्धीसष्ट डोळ्यासमोर ठेऊन मावसभाऊ मनोज जाधव सोबत एमपीएससीच्या अभ्यास क्रंमाकात स्वत:ला झोकुन दिले.मावसभावा सोबत इतकी प्रचंड आत्मीयता,ममत्व,प्रेम,आदर,होता की जीवनात तो सर्वकाही बनलेला होता.त्यामुळे दोंघाचे मैत्रीच नात्याची घट विण बांधल्या गेली होती. त्यामुळे सन:1992 मध्ये पहल्याच टर्ममध्ये एमपीएससीच्या परिक्षेत उंत्तुग भरारी घेऊन यश संपादन केले.तर मावसभाऊ मनोज जाधव सुध्दा यश प्राप्त करत आज मुंबई मंत्रालयात ग्रामविकास खात्यात उपसचिव पदावर कार्यरत आहेत.

PI Pradip Thakur Lonar Birthday Spesial.Vidarbhadoot Buldhana 2 April 2022 1


प्रदीप ठाकुर सरांची एमपीएससीच्या परिक्षेतून पोलीस विभागात निवड झाली आणि आईवडिलांनी लग्नाच्या बेड्या अडकवण्यासाठी स्थळ शोधून आणले आणि शुभमंगलम सावधान... उरकून टाकले.आता मात्र परत डोक्यावर जबाबदारी वाढली होती.पण स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी सन:1993 मध्ये नागपुर पोलीस विभागात  प्रशिक्षण पुर्ण करुन पहली पोस्ट नागपुर शहरातील सिताबर्डी पोलीस ठाण्यातच मिळवली.जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर माणूस गगणभरारी घेऊ शकतो हे सिद्ध करुन दाखवले आदरणीय प्रदिप ठाकुर सरांनी,दुसरी पोस्ट कोतवाली पोलीस ठाण्यात झाली आणि कणखर, प्रभावशाली,बाणा असल्याने खडतर प्रवास करावा लागला.त्यामुळे अनुभवाचे धडे शिकण्यास मिळाले.सन:2000 मध्ये जळगांव जिल्हात बदली झाली आणि विषेश सुरक्षा विभागात असताना, नामवंत,किर्तीवंत एका विधितज्ञ सरकारी वकिल अॅड उज्जवल निकम सराच्या सुरक्षा करता निवड झाली.त्यानंतर अमरावती शहरात प्रमोशन झाले आणि दोन वर्षानंतर यवतमाळ मध्ये बदली झाली.कोळसा खदान,नशलग्रस्तभागात सुद्धा अत्यंत डोळ्यात तेल घालून चोखपणे कामगीरी बजावली.गुन्हेगारीचा नायनाट करण्यासाठी अशा संवेदनशील भागात लढा दिला. 

PI Pradip Thakur Lonar Birthday Spesial.Vidarbhadoot Buldhana 2 April 2022


परत जळगांव, नंदुरबार भागात बदली झाली परत जळगांव असं भ्रमण करत करत बुलढाणा जिल्हामधील शिवाजी नगर,धाड,आर्थीक गुन्हेशाखा, मलकापुर, सायबर पोलीस विभागात धडाकेबाज दबंगगिरीने जिल्हात नावलौकीक मिळवले आहे.दि.24 ऑगस्ट 2021 पासून जगातील दुसऱ्या क्रंमाकाचे सरोवर असलेल्या निसर्गसंपन्न लोणार पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक या पदावर प्रदिप ठाकुर सर कार्यरत आहेत.इतिहास घडवणारी माणसं  इतिहास विसरु शकत नाही.त्यानुसार अनेक पैलू असलेलं प्रज्वलित व्यक्तिमत्व प्रदीप ठाकुर पोलीस निरीक्षक यांची परिचयात्मक ओळख  चाणक्य नीती,धडाकेबाज, कामगिरीने लोणार तालुक्याच्या नजरेत भरते.कर्तृत्व,वकृत्व, आणि नेतृत्वामुळे आपल्या बेधडकपणे गुन्हेगारांच्या मुचक्या आवळत असून, पोलीस विभागात निर्भीड,खमके पोलीस निरीक्षक म्हणून प्रदीप ठाकुर प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत आहेत.कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस निरीक्षक 'खमक्याÓ असावा लागतो.अधिकारी चांगला असेल तर नक्कीच पोलीस ठाण्याच्या परिसरात शांतता राहण्यास मदत होते.आणि गुन्हेगारीवर 'जरबÓ आणि 'धाकÓ राहत असतो.हेच गुण अंगिकारत प्रदिप ठाकुर सर यांच्या परिसरात गुन्हेगारीवृत्तीच्या लोकांना कधीच अभय देत नाहीत.त्याच्यावर ठोस कार्रवाई करत जेरबंद करतात. पोलीस दलाची जनमानसात प्रतिष्ठा निर्माण करण्यासाठी त्यांनी कत्र्तव्यनिष्ठेला कधिही तडा जाऊ दिला नाही.प्रामाणिक आणि पारदर्शकपणे कर्तव्य निभावत असताना हिंदू-मुस्लिम ऐकोपा टिकून ठेवण्यासाठी सामाजिक एकात्मेचा संदेश दिला.कामाबरोबर त्यांनी नेहमीच सामान्यासोबत एक अतूट नाते तयार केले.प्रामाणीक आणि न्यायप्रिय कत्र्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून लोणार पोलीस ठाण्यात प्रदिप ठाकुर यांची ख्याती आहे. कायदेविषयक असलेला दांडगा अभ्यास,गुन्हाची उकल सोडवण्याची त्यांची आगळीवेगळी पद्धत,तपासाचे बाबतीत त्यांच्याकडून उचलली जाणारी तातडीची पावले,त्यांच्याकडे असलेली तीक्ष्ण निरीक्षण क्षमता,शांततापूर्वक काम करण्याची त्यांची आगळीवेगळी पद्धत, सौजन्य पूर्वक आणि शांतता पूर्व,त्याच्याकडे आलेल्या माणसाची वेदना,व्यथा, समजून घेऊन गुन्हेगारीला काबूत ठेऊन सोबतच सामाजिक दायित्व जोपासत कोरोना काळात अडचणीत सापडलेल्या बांधवांना मदतीसाठी आधाराचा हात पुढेच होता.पोलीस दलातील अतिशय संवेदनशील मनाचा,मृदू स्वभावाचे,शांतता प्रिय,अधिकारी म्हणून प्रदीप ठाकुर सर परिचित आहेत.अशा कत्र्तव्यनिष्ठ, प्रज्वलित व्यक्तिमत्व असलेले पोलीस निरीक्षक प्रदिप ठाकुर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त... 

नवे क्षितीज नवी पाहट ,

फु लावी आयुष्यातील स्वप्नांची वाट .

स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .

तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो,

हि:याप्रमाणे चमकत राहो,

आपल्या कर्तुत्वाची ख्याती..

स्नेह जिव्हाळ्याने वृद्धिंगत व्हावी,

मनामनाची नाती

या जन्मदिनी उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा !! 

संतोष अवसरमोल (पत्रकार)

मु.पो.घाटबोरी/ ता. मेहकर 

मो: 9689777129Post a Comment

0 Comments