Ticker

6/recent/ticker-posts

लाचखोर पोलीस पाटील व ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात

 



प्रकरणाची गोडक्यात हकीकत अशा प्रकारे आहे की, तक्रारदार यांनी त्यांचे बडिलाचे नावे ग्राम यावलखेड शिवारात हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट सुरू करण्याकरीता आवश्यक असलेले प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रे देण्याकरीता १,२०,०००/- रूपये लाचेची मागणी करीत असल्याची तकार दि. २०/०६/२०२४ रोजी अॅन्टी करप्शन ब्युरो अकोला येथे तक्रारदार दिली.


नमुद तकारीच्या अनुषंगाने शासकिय पंचासमक्ष दि. २४/०६/२०२४ रोजी ग्राम यावलखेड शिवारात जि. अकोला येथे लाब मागणी पडताळणी कार्यवाही आजमाविण्यात आली असता, पंचासमक्ष तकारदारने यातील आरोपी क. १ यांना त्यांच्या हटिलच्या कामासंबंधाने आवश्यक असलेल्या दाखले आणि प्रमाणपत्रांबाबत विचारणा केली व यापुर्वी सदर कामाकरीता आरोपी क. २ श्रीमती पोरे, सभिव, ग्रामपंचायत कार्यालय यावलखेड यांनी मागणी केलेल्या १,२०,०००/- रूपये लाच मागणी केल्याचे तसेच आरोपी क. २ श्रीमती पोरे यांनी ताब मागणीस समर्थन देवुन लाच मागणीत सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.


त्यानंतर आज दि. २७/०६/२०२४ रोजी आरोपी क. १ आणि आरोपी क. २ यांना त्यांचे मोबाईलवर संपर्क करून भेटण्याबाबत विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देवुन भेटण्यास टाळाटाळ केली. वरून आरोपी यांनी मागणी केलेली साच रक्कम तक्रारदार यांच्या कडुन स्विकारणार नसल्याचे व त्यांना संशय आल्याचे तक्रारदार यांची खात्री पटली वरून आरोपी क. १ यांना पंचासमक्ष ताब्यात घेण्यात आले व त्यांच्या विरूध्द पी.स्टे. बोरगाव मंजू ता. जि. अकोला येथे अप.नं. ३२३/२४ कलम ७ व १२ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.


सदरची कारवाई पोलीस अधिक्षक श्री. मारूती जगताप, अपर पोलीस अधिक्षक श्री. अनिल पवार लाप्रवि अमरावती यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. सचिन सावंत, पोलीस निरीक्षक श्री. नरेंद्र खैरनार, पोलीस अंमलदार डिगांबर जाधव, प्रदिप गावंडे संदिप ताले, सुनिल येलीने, किशोर पवार, निलेश शेगोकार, श्रीकृष्ण पळसपगार यांनी केली.

Post a Comment

0 Comments