Ticker

6/recent/ticker-posts

अन् दिली एक लाखाची मदत

 आशा फाउंडेशनला सप्तश्रृंगी महिला अर्बनने केले 1 लक्ष रुपयांचे आर्थिक सहाय्य

Vidarbhadoot


बुलडाणा/विष्णू वाघ-    कोरोना मध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला, अनेकांचे कुटुंब उध्वस्त झाले, अनेकजण आपल्या आई-वडीलाविना पोरके झाले, या महामारीने आई वडील हिरावुन घेतल्या मुळे या निरागस बालकांचे भविष्य अंधारमय होण्याची भीती निर्माण झालीय बालकांच्या जीवनात आशेच किरण निर्माण करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे  सरचिटणीस मा.श्री. मुकुलजी वासनिक साहेब हे अध्यक्ष असलेल्या आशा फाउंडेशन ने ह्या बालकांना दत्तक घेण्याचा व त्यांचा सांभाळ करण्याचा निर्णय घेतला आहे.


त्यांच्या ह्या कार्यासाठी आपला सुध्दा हातभार लागावा ह्या सामाजिक जाणिवेतून मेहकर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय 'देवानंद भाऊ पवार' यांच्या मार्गदर्शनाखाली सप्तश्रृंगी महिला अर्बन को.ऑफ क्रेडिट सोसायटी मर्यादित मेहकर मुख्यालय जानेफलच्या वतीने संस्थेच्या अध्यक्षा कु. "माधुरी देवानंद पवार" यांनी एक लक्ष रुपयांचा निधी आशा फाऊंडेन साठी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. श्री. राहुलभाऊ बोंद्रे ह्यांच्या कडे सुपूर्द केला यावेळी  'माधुरीताई' यांच्या सोबत संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. संगीताताई विष्णू वाकळे, संचालिका सौ. कल्पनाताई नामदेव राठोड ह्या सुध्दा उपस्थित होत्या.


यावेळी जि.प.च्या मा.अध्यक्षा मनिषाताई पवार, चिखली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष समाधानभाऊ सुपेकर, प्रदेश व्ही. जे.एन.टी सेलचे अश्विन जाधव, माजी पं.स.सदस्य भारत खासभागे, निंबाळजी आडे, दारासिंग पवार, नामदेव राठोड आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments