Ticker

6/recent/ticker-posts

विद्यार्थ्यांसाठी मोफत रक्तगट तपासणी



पेठ / मनोज जाधव आज दि.14 मार्च 2022 वार सोमवार मा.ज्ञानदेव गणपतराव शेळके (सचिव, श्री ज्ञानेश्वर समाज प्रबोधन संस्था पेठ) यांच्या 67 व्या वाढदिवसानिमित्त श्री ज्ञानेश्वर विद्यालय पेठ या ठिकाणी तुळजाई पॅथॉलॉजी लॅब पेठ यांच्या वतीने शालेय विध्यार्थ्यांसाठी मोफत रक्तगट तपासणी शिबीर आयोजित केले होते. या शिबिरामध्ये  शाळेतील सर्वच विध्यार्थ्यांनी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला. तुळजाई लॅब चे संचालक शुभम ज्ञानेश्वर वाघ (Msc. Micro PG.DMLT) यांच्या संकल्पनेतून हे शिबीर पार पडले.


धकाधकीच्या जीवनात आपल्या जीवनाकडे आपले दुर्लक्ष होते, तसेच शालेय विध्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा फ्रॉम भरायचा असल्यास रक्तगट आवश्यक लागतो. त्यामुळे विध्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये तसेच सर्व विध्यार्थ्यांना आपला रक्तगट माहिती असावा यासाठी हे शिबीर आयोजित केले होते.


शिबिराचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानदेव भाऊ शेळके यांनी केले तसेच सूत्रसंचालन श्री नंदकिशोर वाघ सर यांनी केले. शिबिरासाठी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष सगरभाऊ शेळके, प्राचार्य मनोहर साळोक सर,प्रा. मोरे सर प्रा.रिंढे सर, प्रा.शेळके सर, प्रा.काकडे सर श्री.हिवरकर सर, श्री.शेळके सर, श्री.पंडितराव देशमुख सर श्री.भाकडे सर श्री. झाल्टे सर श्री.जाधव सर,मनोज जाधव (विदर्भदूत जि. प्रतिनिधी बुलडाणा) हे उपस्थित होते.


तसेच शिबिरासाठी विशेष सहकार्य लॅब टेक्निशियन अर्जुन उज्जैनकर, ऋषिकेश शेळके, अभिषेक देशमाने नीलेश जाधव कार्तिक जुमडे यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments