Ticker

6/recent/ticker-posts

घाटबोरीत ग्रा.सोसायटीवर प्रल्हादआप्पा चूकेवार अध्यक्षपदी बिनविरोध

 


मेहकर- तालुक्यातील घाटबोरीत होऊ घातलेल्या ग्रामसेवा सहकारी संस्था निवडणुकीत दिलीप पाटील नवले व रविकुमार चूकेवार, विष्णूपंत पाखरे,यांच्या गटाने वर्चस्व प्रस्थापित केले असून,प्रल्हादआप्पा चूकेवार यांची अध्यक्षपदी तर रामभाऊ नालिंदे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली त्यामुळे प्रतिस्पर्धी पॅनलचा धुव्वा उडविला.या विजयाने घाटबोरीत दिलीप पाटील नवले, रविकुमार चूकेवार, विष्णूपंत पाखरे, यांच्या गटाचा दबदबा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.सहकारी सोयायटी निवडणूकीत १२ जागांपैकी या गटाने अध्यक्ष, उपाध्यक्षपदासह एकुण ७ जागांवर आपलं वर्चस्व प्रस्थापित केले आहे. 

राजकीयदृष्ट्या प्रतिस्पर्धी गटाने सहकारी संस्था निवडणुक आगामी जि.प.निवडणूक डोळ्यासमोर ठेवून प्रस्थापित गटासोबत हातमिळवणी करून मनोलिलन करुन अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणूकीत आपल्या पाच सदस्यांची अनुपस्थित दाखवली त्यामुळे ७ सदस्य उपस्थित प्रल्हाद आप्पा चूकेवार अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले ही ग्रामसेवा सहकारी सोसायटी निवडणूक डि.बी.बोर्डे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसेवा सहकारी सोसायटी घाटबोरीत निवडणूक पार पडली.

 त्यावेळी सोसायटीचे सचिव रमेश कूंडलीक अवसरमोल यांच्या उपस्थितीत प्रल्हाद सदाशिव चूकेवार यांची अध्यक्षपदी तर रामभाऊ राजाराम नालिंदे उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी प्रस्थापित गटाचे सदस्य गजानन डाखोरे,आत्मराम राठोड, महादेव गिरी, रामभाऊ डोंगरे,सौ कमल ज्ञानबा नवले,हे उपस्थित राहुन प्रोसिंडीगवर सह्या केल्या होत्या तर प्रतिस्पर्धी गटाचे पाचही सदस्य अनुपस्थित होते.त्यामुळे प्रस्थापित गटाचे नेतृत्व करणारे दिलीप पाटील नवले,विष्षूपंत पाखरे,बसलिंगआप्पा डोंगरे, श्रीकृष्ण वाघमारे,कांताआप्पा डोंगरे,सुधिर घोडे, होते तर पुरुषोत्तम पाटील नवले, वसंता जाधव, शेषराव अंभोरे,बिटुआप्पा चूकेवार,इनुसअली मिस्त्री,विजय पाटील नवले, विलास दोडेवार,अजय चूकेवार,भागवत घुणे,अनेक गावकऱ्यांची उपस्थित होते

Post a Comment

0 Comments