Ticker

6/recent/ticker-posts

नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद सरकारने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना एकरी 2 लाख रुपये नुकसानभरपाई म्हणून द्यावे

 रयत क्रांती संघटनेचे पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना निवेदन



जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केली मागणी




बुलडाणा- राज्यात सोयाबीनचे भाव दहा हजारावर गेले अचानक केंद्र सरकारने सोयाबीन पेंड आयात केली. त्यामुळे सोयाबीनचे भाव अचानक कोसळले याची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्र सरकारने एकरी 2 लाख रुपये नुकसानभरपाई म्हणून शेतकऱ्यांना द्यावे. त्याचप्रमाणे सोयाबीनला 10 हजार रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर करावा. अशा मागण्या केंद्रसरकार कडे तर पिकविम्याबाबद होत असलेला विलंबाचे कारण शोधून राज्य सरकारने शेतकऱ्यांना त्वरित पीकविमा मिळवून द्यावा.

त्याचप्रमाणे अतिवृष्टी मुळे झालेले नुकसान लक्षात घेऊन विदर्भात ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानभरपाई म्हणून राज्य सरकारने शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपये मदत घ्यावी. अशी मागणी राज्यसरकार कडे करीत आज रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री.तुषार काचकुरे यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत  देशाचे पंतप्रधान व राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली यावेळी त्यांच्यासोबत रयत चे पदाधिकारी सोनूभाऊ चव्हाण,श्री. राजपूत,श्री.भराड, व कार्यकर्ते उपस्थित होते.

सरकारने या निवेदनाची दखल घेऊन त्वरित कार्यवाही न केल्यास आंदोलनाचा इशारा देखील यावेळी देण्यात आला.

Post a Comment

0 Comments