Ticker

6/recent/ticker-posts

कु.ममता वानखडे आरबीआय ग्रेड बी' परिक्षा केली उत्तीर्ण


 

राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे कु.ममता वानखडेचा सत्कार

Amravati-स्थानिक विलास नगरातील सामान्य कुटुंबातील विद्यार्थिनी कु.ममता रामभाऊ वानखडे हिने रिझर्व बँक ऑफ इंडिया तर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत आरबीआय ग्रेड बी ऑफिसर म्हणुन सुयश प्राप्त केल्याबद्दल राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

आरबीआय तर्फे व्यवस्थापक पदाकरता संपूर्ण देशभरात ही परीक्षा घेण्यात आली होती.त्यामध्ये देशातून दोन लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये चर्मकार समाजातील अमरावतीच्या कु.ममता रामभाऊ वानखडे हिचा समावेश आहे.कु.ममता रामभाऊ वानखडे हिने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती मधुन २०१९ मध्ये बी.टेक केले होते. 

ममताने अनेक अडचणीवर मात करून अथक परिश्रम करून हे घवघवीत यश संपादन केले आहे तसेच समाजाची मान उंचावली आहे.पुढील जीवनात सुद्धा असेच यश संपादन करून आई वडील व समाजाचे नाव उंचावेल अशा शुभेच्छा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष निलेश जामठे यांनी दिल्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष गजानन वानरे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा अध्यक्ष निलेश जामठे,जिल्हा उपाध्यक्ष जगदेव रेवसकर हे होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक योगेश पखाले यांनी केले तर आभार प्रदर्शन विजय शेकोकार यांनी केले.कार्यक्रमाला वडील रामभाऊ वानखडे,आई वनिता वानखडे,भाऊ वैभव वानखडे,विजय अंबाडकर,आराध्य शेकोकार,इंदू मालखेडे आदिसह समाजबांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments