Ticker

6/recent/ticker-posts

प्रसाद शेळके "कृषीदूत" याने साधला शेतकाऱ्यांसोबत सोयाबीन पिकाविषयी संवाद



पेठ - मनोज जाधव- महात्मा फुले कृषी विद्यापिठ राहुरी अंतर्गत सुरू असलेल्या ग्रामीण कृषी जागरूकता व औदयोगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गतकृषीदूत श्री प्रसाद तुकाराम शेळके हा चिखली तालुक्यातील पेठ या गावामधील शेतकऱ्यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठ निर्मित "फुले संगम" संकरित वाणाचे महत्व पटवून देण्यासाठी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत असलेल्या कृषी महाविद्यालय पुणे ०५शिवाजी नगर या महाविद्यालयाचे कृषीदूत प्रसाद तुकाराम शेळके याने कृषी पदवी अभ्यासक्रमा अंतर्गत ६ महिन्याचा कृषी विषयक प्रात्याक्षिक अभ्यास क्रमासाठी पेठ गावची निवड केली.यामध्ये कृषी विद्यापीठ निर्मित फुले संगम या संशोधित वाणाचे फायदे व त्याची लागवड आणि जोपासना कशा प्रकारे करायचे या विषयाचा शेतकऱ्यांमध्ये संवाद साधला तसेच मान्यवरांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली.

 या कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख पाहुणे प.स.विस्तार अधिकारी श्री बी. जि. वाघ तसेच पेठ गावचे सरपंच श्री विष्णुपंत शेळके, सचिव मा, पडघान साहेब ,भगवान गायकवाड,कडूबा टेंगसे, ग्रा, प, सदस्य मारोती तायडे व बहुसंख्य शेतकरी हजर होते.या उपक्रमासाठी कृषी महाविद्यालय पुणे येथील सहयोगी अधिष्णता,डॉ, सुनील मासाळकर डॉ, यु, जी, जगदाळे,डॉ, राम व्ही ,आजोतिकरयांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments