Ticker

6/recent/ticker-posts

नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या

 समाजकार्य संघाचे विदर्भ उपाध्यक्ष अनिल मोरे तसेच स्व.मंगलबाई वाघ पाटील बहुउदेशीय शिक्षण संस्था याचे सचिव सुनिल पाटील वाघ याची मागणी



LONAR- शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला पिकांचा घास संततधार व मुसळधार पावसाने हिसकावून घेत उभ्या पिकांना कोंब फोडले आहे. त्यामुळे विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यातील उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे लोणार ,मेहकर ,सिंदखेड राजा , भुमराळा ,सुलतानपूर शिवारातील जमीन कोरडवाहू आणि डोंगराळ असल्याने हलक्‍या स्वरूपाची आहे.



त्यामुळे या भागात जास्त पाऊस पडल्यामुळे जमिनीची भारतात तर कमी पाऊस पडल्यामुळे जमिनीला भेगा पडून पिकाचे नुकसान होते .अशा दुहेरी संकटात असलेल्या शेतकऱ्यांना शेत मशागतीची कामे करत उत्पन्न काढावी लागत आहे .या वर्षी पावसाने सुरुवातीला चांगली सुरुवात केल्याने हिरवेगार पिकांची शेती बहरून गेली आहेत ,पिकाची अवस्था पाहून शेतकऱ्यांनी पिकावर खत व औषधे यासाठी खूप मोठ्या प्रमाणात खर्च सुद्धा केला आहे परंतु शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास, सुरू असलेल्या सरदार व मुसळधार पावसाने हिसकावून घेत उभ्या पिकांना कोंब आणले आहे.

 यामध्ये सोयाबीन, भुईमूग या पिकांना आलेले कोंब आणि झालेल्या पिकाची नुकसानीची पाहणी व पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी राष्ट्रीय विश्वगामी समाजकार्य संघाचे विदर्भ उपाध्यक्ष अनिल मोरे यांनी केली. अन्यथा झालेल्या नुकसानीचे सोयाबीन पिक हे शासन दरबारी आणुन आंदोलन करु. असा इशारा दिला आहे..


Post a Comment

0 Comments