Ticker

6/recent/ticker-posts

पत्नीने केली पतीविरुध्द तक्रार, पोलिसांनी पतीला अटक केली, अन्.....

From Pixabay


बिजनौर | प्रसिद्धी मिळविण्यासाठी आणि श्रीमंत होण्यासाठी वाट्टेल ते करण्याची अनेकांची तयारी असते. यासाठी अनेकजण चुकीच्या मार्गाचा अवलंब करतात. या कामात केवळ पुरुषच नाही तर स्त्रियाही अग्रेसर आहेत.


अशीच एक घटना उत्तर प्रदेशमधील बिजनौर येथे घडली आहे. येथील एका तरूणाला आपल्याच पत्नीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. 


मात्र चौकशी दरम्यान हा तरुण स्वतःच मुलगी असल्याचे समोर आले, त्यामुळे पोलिसही थक्क होऊन गेले.


मिळालेल्या माहितीनुसार, बिजनौर भागातील धामपूर येथे राहणा-या स्वीटीने आपले नाव बदलून कृष्णा सेन केले. 2013 साली, फेसबुकच्या माध्यमातून तिची एका मुलीशी मैत्री झाली आणि ती एक तरूण असल्याचे तिने सांगितले. कालांतराने या दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.


पुढे दोघांचेही लग्न झाले. या लग्नात कृष्णाने मुलीकडून पाहिजे तितका हुंडा घेतला. मात्र पैशाचा हव्यास काही कमी झाला नाही. पुढे त्याने पहिली पत्नी असतांना पैशाच्या लोभापाई दुसर्‍या मुलीशी लग्न केले आणि पुन्हा हुंडा घेतला. 


तो या दोघींसोबत राहू लागला. काही दिवसांनंतर जेव्हा कृष्णाचे पैसे संपले तेव्हा तिने आपल्या पहिल्या पत्नीला मामाकडे पैसे मागायला सांगितले, यावरुन दोघांमध्ये भांडण झाले. कृष्णाची पैसे मागण्याची सवय पटत नसल्याने तिने कृष्णावर हुंड्यासाठी छळ केल्याची तक्रार दाखल केली.


पोलिसांनी कृष्णाला ताब्यात घेत कसून चौकशी सुरु केली. तेव्हा स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्यासाठी कृष्णाने पोलिसांना ती एक स्त्री असल्याचे सांगितले. हे ऐकून पोलिस थक्कच झाले. पोलिसांनी कृष्णाला तपासणीसाठी रूग्णालयात नेले असता, तिथे ती महिला असल्याचे सिद्ध झाले. 


तक्रारीत कृष्णाच्या पत्नीने कृष्णाशी लैंगिक संबंध असल्याचे पोलिसांना सांगितले होते. याबाबत पोलिसांनी कृष्णाकडे चौकशी केली असता, आपण ऑनलाइन साइटवरून लैंगिक खेळण्यांचे ऑर्डर देऊन या दोन्ही महिलांशी संबंध ठेवल्याची कबुली कृष्णाने दिली आहे. कृष्णाच्या दोन्ही पत्नींना याबद्दल कधीच कळले नाही.

Post a Comment

0 Comments