Ticker

6/recent/ticker-posts

झिका व्हायरसचा धोका वाढतोय; ‘या’ राज्यात हायअलर्ट जारी!



तिरुवनन्तपुरम | कोरोनाची परिस्थिती अद्यापही केरळमध्ये चिंताजनक स्थितीत असतांना, आणखी एका विषाणूचा प्रादुर्भाव केरळमध्ये वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.


केरळमध्ये 'झिका' या नवीन विषाणूचा पहिला रुग्ण आढळला आहे. डेंग्यूच्या एडिस इजिप्तीसारख्या डासांमुळे हा रोग होत असल्याचे सांगण्यात येत आहे. 


तिरुअनन्तपुरम येथील एका 24 वर्षीय गर्भवती महिलेला झिका या विषाणूची लागण झाली होती. परंतू शनिवारपर्यंत या रोगाच्या रुग्णांची संख्या 15 वर जाऊन पोहोचल्याने चिंता वाढली.


'आमचा विभाग या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. कोविड रुग्णसंख्या ही कमी आहे. केरळात प्राणवायूअभावी कुणीही मरण पावलेले नाही. झिका विषाणूविरोधात केरळने कृती योजना तयार केली आहे. त्यामुळे झिकाचा प्रसार होणार नाही. शुक्रवारी केंद्राने तज्ज्ञांचे पथक तेथे पाठवले होते. राज्य सरकारच्या मदतीसाठी काही सामुग्रीही पाठवली होती, अशी माहिती आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली आहे. 


या व्हायरसचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी केरळ राज्य सरकार हाय अलर्टवर आहे. सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीवर गंभीरतेने लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे, असं देखील आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments