Ticker

6/recent/ticker-posts

निष्काळजीपणामुळे झाला 12 कोरोना रूग्णांचा मृत्यू; डाॅक्टरांची अनुपस्थिती कारणीभूत

From Pixabay


दिसपूर | कोरोना महामारीने संपूर्ण जगावर थैमान घातले. आलेल्या दुसऱ्या लाटेने तर देशात कहरच केला. यात अनेकांना आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे. 


आता कुठे कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरू लागली आहे. तर कोरोनाच्या डेल्टा प्लस या प्रकाराने डोके वर काढले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. 


नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता, शासनाकडून लसीकरण मोहिम सुरु करण्यात आली आहे. मात्र, अनेक ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांकडून रूग्णांच्या बाबतीत हलगर्जीपणा होतांना दिसून येत आहे. 


अशीच एक घटना गुवाहाटीमध्ये घडल्याची माहिती पुढे आली आहे. मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील डॉक्टर ड्युटीवर नसल्यामुळे चक्क 12 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 


मृत रुग्णांच्या नातेवाईकांकडून रात्रीच्या वेळी अनेकदा डॉक्टर ड्युटीवर येत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.


या रूग्णांना ऑक्सिजन सपोर्ट देऊनही त्यांची ऑक्सिजनची पातळी वाढत नव्हती. यातील काही रुग्णांना एकापेक्षा जास्त व्याधी झालेल्या होत्या. त्याचबरोबर यापैकी कुणीही कोरोनाचा एकही डोस घेतलेला नव्हता, अशी उडवा उडवीची उत्तरे जीएमसीएच चे डीन अभिजित सरमा यांनी दिली आहे. 


कोरोना झालेल्या 12 रुग्णांपैकी, 9 रुग्ण हे आयसीयूमध्ये होते. तर 3 रुग्ण हे कोव्हिड वॉर्डामध्ये होते. त्यांची ऑक्सिजन पातळी खालावल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे, जीएमसीएच चे डीन अभिजित सरमा यांनी सांगितले आहे. 


मात्र, या रुग्णांची ऑक्सिजन पातळी खालावत गेली, तेव्हा डॉक्टर ड्युटीवर उपस्थित नव्हते, असा आरोप रूग्णांच्या नातेवाईकांकडून केला जात आहे.

Post a Comment

0 Comments