Ticker

6/recent/ticker-posts

WHO च्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांची डेल्टा प्लस बाबत दिलासादायक माहिती

From Twitter


नवी दिल्ली | कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे देशात सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. अशातच कोरोनाचा डेल्टा प्लस हा नवा प्रकार सध्यातरी चिंतेचा विषय नसल्याची माहिती, जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी दिली आहे. 


एनडीटीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर माहिती दिली.


कोविशिल्डचा समावेश वॅक्सिन पासपोर्टमध्ये करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना प्रयत्नरत आहे. त्यासाठी युरोपियन वैद्यकीय नियामकाशी चर्चा देखील सुरू आहे. 


ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात याबाबत निर्णय होण्याची शक्यता देखील आहे, असं स्वामीनाथन यांनी सांगितलं आहे.


पुढे त्या म्हणाल्या, डेल्टा प्लस व्हेरिअंट या विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या खुप कमी आहे. कोविशिल्ड या लसीला आपल्या वॅक्सिन पासपोर्ट कार्यक्रमापासून रोखणाऱ्या देशांकडे कोणताही तर्क नव्हता, जे महासाथीदरम्यान कोणत्याही समस्येशिवाय प्रवासाची परवानगी देतात.


डेल्टा प्लस व्हेरिएंटबाबत अजून तरी वैज्ञानिक आधार नाही, ज्याने हा व्हायरस वेगाने संसर्ग पसरवत आहे हे सिद्ध होईल किंवा कोविड लसीचा प्रभाव कमी करत आहे. 


कोणत्याही महामारीची नवी लाट ही अनेक गोष्टींवर निर्भर असते. तसेच विषाणूमध्ये होणारे बदल कोरोना आजाराची गतिशीलता बदलू शकतात. महासाथीची आणखी एक लाट येईल की नाही, हे आमच्या नियंत्रणाखाली नाही, असं मत भारतातील कोविड टास्क फोर्सचे प्रमुख व्ही. के पॉल यांनी व्यक्त केले आहे.

Post a Comment

0 Comments