Ticker

6/recent/ticker-posts

दिलीप कुमार यांच्याबद्दल नसीरुद्दीन शाह यांंचे मोठे वक्तव्य

From Facebook


मुंबई | ट्रॅजीडी किंग जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत सर्वत्र शोककळा पसरली आहे. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने बॉलिवूडसह जगभरातील सर्व चाहत्यांना अश्रु अनावर झाले. 


अशातच नसीरुद्दीन शाह यांनी देखील दिलीप कुमार यांच्या जाण्याने शोक व्यक्त केला आहे. अनेक कलाकारांप्रमाणेच नसीरुद्दीन शाहदेखील दिलीप कुमार यांचे चाहते आहेत. 


मात्र दिलीप कुमार यांनी हिंदी चित्रपटसृष्टीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल नसीरुद्दीन यांचे मत फार वेगळे आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ मध्ये लिहिलेल्या लेखात नसीरुद्दीन शाह यांनी त्यांचे मत मांडले आहे. 


दिलीप कुमार हे एक दिग्गज कलाकार असूनही हिंदी सिनेमा किंवा नवोदितांना पुढे जाण्यासाठी खास योगदान दिलेले नाही, असं नसीरुद्दीन यांनी या लेखात म्हटले आहे.


पुढे ते म्हणतात, इतके महान अभिनेते असूनही दिलीप कुमार यांनी हिंदी चित्रपटसृष्टीसाठी अभिनयाशिवाय काहीच केलेले नाही. ते नेहमीच सामाजिक कार्यात पुढे राहिले. त्यांनी समाजातील अनेक घटकांना मदत केली.


आपल्या अभिनयाच्या अनुभवाचा उपयोग इतर कलाकारांसाठी त्यांनी केलेला नाही. त्यांनी फक्त एका चित्रपटाची निर्मिती केली, परंतू त्यांनी कोणताही चित्रपट दिग्दर्शित केला नाही. नवीन कलाकारांसाठी कोणत्याही प्रकारची मदत देऊ केली नाही. नवीन कलाकारांसाठी असं काहीच केलं नाही, जे पाहून इतरांनी दिलीप कुमार यांच्याकडून प्रेरणा घ्यावी, असंही नसीरुद्दीन यांनी लिहिले आहे.

Post a Comment

0 Comments