Ticker

6/recent/ticker-posts

महिलेच्या डिलीव्हरी नंतर घडले असे काही; डॉक्टर समवेत 3 नर्स झाल्या बेशुद्ध

From Pixabay


रुग्णाचे नाते हे डाॅक्टरावरील विश्वासावर अवलबूंन असते. रोग कुठलाही असो डाॅक्टरांना त्या रोगाबद्दल बरोबर माहिती मिळाली की ते रूग्णाला बरे करण्याचा पुरेपुर प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत, डॉक्टरांवर पूर्ण विश्वास ठेवणे हे खूप महत्त्वाचे आहे.


एखादी व्यक्ती ज्यावेळी त्यांच्या समस्या आणि आजाराबद्दल डाॅक्टरांना सांगतात. त्यावेळी झालेला रोग हा गंभीर स्वरूपाचा तर नाही, हे तपासल्या जाते. आणि त्यानुसार डाॅक्टर उपचार सुरू करतात.


मात्र, जिल्हा महिला रुग्णालयात एक विचित्र प्रकार घडल्याची माहिती पुढे आली आहे. माहितीनुसार, येथील दोन परिचारिका आणि चतुर्थ श्रेणी महिला कर्मचारी एचआयव्ही संसर्गाच्या भीतीमुळे शुक्रवारी चक्क बेेेशुद्ध झाल्या. 


अहवालानुसार, एक गर्भवती महिला एचआयव्ही पॉझिटिव्ह होती. या महिलेला प्रसूतीसाठी जिल्हा महिला रुग्णालयात आणले होते. तिला खूप तीव्र वेदना होत होत्या, म्हणून लवकरच तीला लेबर कक्षात नेण्यात आले.


तिथे या महिलेची प्रसूती झाली आणि तिने एका मुलाला जन्म दिला. परंतू त्यानंतर जे सत्य पुढे आले, त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. 


या महिलेच्या प्रसूतीनंतर येथील कर्मचार्‍यांनी या महिलेवर आधीपासून सुरू असलेल्या औषधांविषयीची वैद्यकीय फाईल तपासली. तयानंतर त्यांच्या लक्षात आले की, गर्भवती महिला ही एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे.


हे ऐकताच दोन परिचारिका व चतुर्थ श्रेणी महिला कामगार त्यांना एचआयव्ही संसर्ग होऊ नये, म्हणून घाबरुन गेले. आणि त्यातच ते बेशुद्ध पडले.


परंतु डॉक्टर म्हणतात की जेव्हा महिलेच्या कुटुंबातील सदस्यांनी तिला रुग्णालयात आणले, तेव्हा त्यांनी ही महिला एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे लपवून ठेवले, जे चुकीचे आहे.

Post a Comment

1 Comments

  1. Sports Betting - Mapyro
    Bet the 바카라 사이트 moneyline from 1:25 PM to 11:00 바카라 사이트 PM. See more. https://septcasino.com/review/merit-casino/ MapYO https://octcasino.com/ Sportsbook features live odds, live streaming, 출장마사지 and detailed information.

    ReplyDelete