Ticker

6/recent/ticker-posts

धक्कादायक! बुलडाण्यात एकाच कोरोना रुग्णाला देण्यात आले तब्बल 14 रेमडेसिविरचे डोस

From Pixabay


बुलडाणा | देशात कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरू लागली असतांनाच कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस या प्रकाराने चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, बुलडाण्यात घडलेल्या एका घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. 


बुलडाणा जिल्हातील खामगाव येथील एका खासगी रुग्णालयात ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एकाच रुग्णाला तब्बल 14 रेमडेसिविर इंजेक्शनचे डोस दिल्याचा अमानुष प्रकार घडला आहे. 


माहितीनुसार, खामगाव येथील लाईफ लाईन या खाजगी रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू होते. कुठल्याही कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी रूग्णालयाने जिल्हा शल्यचिकित्सकांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. 


परवानगी शिवाय उपचार करणे कायद्याने चुकीचे ठरविले जाते. परंतु, या रुग्णालयात मात्र कुठल्याही परवानगीविना कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असल्याची बाब पुढे आली आहे. 


त्यामुळे आता हे रुग्णालय जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांच्या आदेशानुसार सील करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


जिल्ह्यातील या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. खासगी रुग्णालयांकडून सुरू असलेला हा काळाबाजार प्रशासनातर्फे बंद करणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. 


या रुग्णालयात अनधिकृतपणे कोरोना रुग्णांवर उपचार होत असल्याची तक्रार सुरूवातीला प्राप्त झाली होती. या तक्रारीची दखल घेत तहसीलदारांनी तात्काळ समिती नेमून चौकशी करण्याचे आदेश दिले होते. चौकशीदरम्यान या रुग्णालयात एका रुग्णाला तब्बल 14 रेमडेसिविर इंजेक्शनचे डोस दिल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

Post a Comment

0 Comments