Ticker

6/recent/ticker-posts

आता लहान मुलांच्या लसीच्या चाचणीला होणार सुरुवात



पुणे | एकीकडे कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत असतांना दुसरीकडे कोरोनाच्या डेल्टा प्लस या नव्या प्रकाराने डोके वर काढायला सुरुवात केली आहे. 


त्याचबरोबर तज्ज्ञांकडून आता कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच आता लहान मुलांच्या पालकांसाठी एक आनंदाची बाब समोर आली आहे. 


सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि अमेरिकन औषध कंपनी यांनी मिळून लहान मुलांना देण्यात येणारी नोवोव्हॅक्स लस तयार केली आहे. लहान मुलांना देण्यात येणाऱ्या लसीच्या चाचणीला लवकरच सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.


या लसीच्या लहान मुलांवरील चाचणीला पुण्यातील भारती विद्यापीठ आणि केईएम रुग्णालयात सुरुवात होणार असल्याची, माहिती पुढे आली आहे.


या चाचणीच्या पहिल्या टप्प्यात 12 ते 17 या वयोगटातील मुलांना ही लस देण्यात येणार आहे. त्यांच्यावरील चाचणी यशस्वी झाल्यानंतर 2 ते 11 या वयोगटातील लहान मुलांवर या लसीची चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीतर्फे देण्यात आली आहे. 


त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वी लहान मुलांसाठी तयार करण्यात आलेली, ही लस बाजारात उपलब्ध होण्याची, शक्यता वर्तवली जात आहे. 


देशात 10 ठिकाणी या नोवोव्हॅक्स लसीच्या क्लिनिकल ट्रायलला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे जुलै महिन्यात या लसीच्या चाचणीला सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments