Ticker

6/recent/ticker-posts

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; एका महिन्यात चक्क 16 वेळा इंधन दरवाढ

From Pixabay


मुंबई | कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे शिथिल करण्यात आलेले निर्बंध राज्यात पुन्हा कडक करण्यात आले आहेत. अशातच गेल्या तीन महिन्यांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सतत होणारी दरवाढ स्थीर झाल्याचे चित्र होते. पण आता पुन्हा एकदा इंधन दरवाढीचे चित्र बघायला मिळत आहे. 


देशातील पाच राज्यांच्या निवडणुका होईस्तोव स्थीर असलेल्या किंमती पुन्हा एकदा निवडणूका संपल्याचे बघून वाढायला लागल्या की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 


मागील एका महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तब्बल 16 वेळा वाढ करण्यात आली आहे. अच्छा दिनाची स्वप्न बघत पेट्रोल ने शंभरीचा आकडा कधीचाच पार केला आहे. आताच्या नव्या पेट्रोलच्या किंमतीत 34 पैसे तर डिझेलच्या किंमतीत 30 पैशांची वाढ करण्यात आल्याचे विदारक चित्र आहे. ज्याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य माणसाला पुन्हा एकदा बसणार आहे. 


या दोन्हींच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर मुंबईतील पेट्रोलची आजची किंमत 104.90 रुपये प्रति लिटर एवढी असून डिझेलची किंमत 96.72 रुपये प्रति लिटर एवढी आहे. 


त्यामुळे सरकार इंधन दरवाढी विरोधात कुठले पाऊल उचलणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments