Ticker

6/recent/ticker-posts

महाविद्यालयाचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा निर्णय लवकरच- उदय सामंत



पुणे | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षापासून शैक्षणिक सत्राचे बारा वाजले आहे. शाळा, महाविद्यालये बंद असल्याने ऑनलाईन शिक्षण घेण्यात येत आहे. हळूहळू कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्याने बंद असलेली महाविद्यालये पुन्हा सुरू होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. 


मात्र, कोरोनाच्या नव्या डेल्डा प्लस प्रकारामुळे शिथिल करण्यात आलेले निर्बंध राज्यात पुन्हा लावण्यात आले आहेत. अशातच उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी महत्वाची घोषणा केली आहे.


या वर्षात महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा म्हणजेच 15 सप्टेंबरपासून सुरू करण्याचा प्रयत्न असून, याबाबत लवकरच निर्णय जाहीर केला जाणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे. 


कोरोनाच्या संकटात अनेक कुटूंबाना आर्थिक फटका बसल्याने, विद्यार्थ्यांपुढे देखील फीस भरण्यासाठी प्रश्न निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत नागपूर विद्यापीठाने शैक्षणिक शुल्कात कपात करून विद्यार्थ्यांना सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. 


इतर विद्यापीठांनी देखील शुल्क कपातीबाबत विचार करून निर्णय घ्यावा, असं आवाहन त्यांनी कुलगुरूंना करणार असल्याचे सांगितले आहे.


कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून प्राध्यापक भरती थांबली होती. ही भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातील पहिला टप्प्यात 3 हजार 74 प्राध्यापकांच्या रिक्त जागेची भरती करण्यात येणार असून, पुढील आठवडयापासून ही सुरू करण्यात येण्याचे त्यांनी सांगितले आहे. 


त्याचबरोबर 121 जागांवर ग्रंथपाल भरती आणि विद्यापीठातील 659 जागांवर शिक्षकीय भरती करण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असंही त्यांनी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments