Ticker

6/recent/ticker-posts

लोणावळ्यात चक्क 900 पर्यटकांकडून लाखांचा दंड वसूल

बंदी असतांनाही फिरायला जाणे भोवले




मुंबई | जून महिन्यापासून सुरू होणा-या पावसाळ्याची चाहूल लागताच, पर्यटनस्थळी पर्यटकांची गर्दी दिसून येते. राज्यातील लोणावळा या स्थळी देखील मुंबई, पुणे आणि इतर जिल्ह्यातील अनेक पर्यटक येतांना दिसून येतात. 


परंतू कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या कित्येक दिवसांपासून शासनाद्वारे पर्यटनावर बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत असतांना शासनाकडून काही निर्बंध शिथील करण्यात आले आहे. परंतू पर्यटणस्थळांवरील निर्बंध मात्र अजूनही कायम आहे. 


मात्र असे असतांनाही, अनेक लोक कोरोना नियमांचे उल्लंघन करून फिरण्यासाठी बाहेर पडत असल्याचे दिसत आहे. अशातच लोणावळा इथे देखील पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यात आली होती. त्यामुळे या पर्यटकांवर शासनाकडून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.


दरम्यान, बंदी असतांना देखील शनिवार व रविवारी लोणावळ्याला फिरायला आलेल्या एकूण 900 पर्यटकांवर लोणावळा पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. या सर्व 900 लोकांकडून 4.28 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments