Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांची बुलढाणा अर्बन वेअर हाऊस व कोल्ड स्टोरेज ला सदिच्छा भेट





चिखली - महाराष्ट्र राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी बुलढाणा अर्बनच्या वेअर हाऊस व कोल्डस्टोरेजला बुधवारी अभ्यास दौरा निमित्ताने सदिच्छा भेट दिली.


बुलढाणा अर्बन चे राज्यभरात विविध सामाजिक तथा लोकोपयोगी उपक्रम आहेत. या माध्यमातून राज्यभरातील शेतकरी वर्गाची गरज लक्षात घेता, वेअर हाऊस, कोल्ड स्टोरेज आदींची निर्मिती करून शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे.


या कार्याबद्दल एकनाथ डवले यांनी बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी तसेच बुलढाणा अर्बनचे चिफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. सुकेश झंवर यांचे कौतुक केले. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा कृषी अधिकारी श्री. डवरे, उपसंचालक मुनीवर, तसेच कृषी कार्यालय बुलडाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



यावेळी डवले यांनी बुलढाणा अर्बनच्या वेअर हाऊस व कोल्डस्टोरेज परिसराची स्वच्छता बघून कौतुक केले. तसेच कोल्ड स्टोरेजमध्ये असलेल्या हरभरा, तूर, कांदाबीज, ड्रायफ्रुट्स, तसेच डॉलर हरभरा आदींची पाहणी केली व मालाची प्रत पाहून समाधान व्यक्त केले आणि तेथील येणाऱ्या मालाची आवक-जावक कशा पद्धतीने केली जाते व मजूर कशा पद्धतीने काम करतात, याचे प्रत्यक्ष अवलोकन केले.


कोल्ड स्टोरेजच्या उपलब्ध असलेल्या मालावर कुठल्याही प्रकारचे फेब्रिकेशन व फवारणी न करता मालाची प्रत उत्कृष्ट असल्याबद्दल त्यांनी बुलढाणा अर्बनचे विशेष कौतुक केले. 


यावेळी बुलढाणा अर्बनचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. सुकेश झंवर यांनी बुलडाणा अर्बनच्या वेअर हाऊस संदर्भात संपूर्ण माहिती दिली आणि चिखली येथील कोल्ड स्टोरेजप्रमाणे, मलकापूर येथे सुद्धा कोल्ड स्टोरेज शेतकऱ्यांसाठी एका वर्षापासून उपलब्ध करून दिले असल्याचे सांगितले. 


त्याचबरोबर नियोजित कोल्ड स्टोरेजची शृंखला येत्या एका वर्षात तीन ते चार कोल्ड स्टोरेज शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन देखील डाॅ. झंवर यांनी दिले आहे.


महाराष्ट्र कृषी सचिव एकनाथ डवले यांचे डॉ. सुकेश झंवर यांच्या हस्ते शाॅल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. तर जिल्हा कृषी अधिकारी डवरे, उपसंचालक मुनीवर यांचे स्वागत सुद्धा डाॅ. झंवर यांनी केले.


या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर भालेराव तर आभार संजय सोनवणे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी बुलडाणा अर्बन शाखा एम.आय.डी.सी चिखली चे कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments