Ticker

6/recent/ticker-posts

इंजिनीयरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी उदय सामंत यांची मोठी घोषणा



मुंबई | कोरोनाचा प्रतिकूल असा परिणाम देशातील सर्वच क्षेत्रावर झाला. अनेकांचे कुटूंब उध्वस्त झाले, अनेकजण बेरोजगार झाले. शिक्षण क्षेत्रावरही याचा फार मोठा परिणाम झालेला दिसून आला आहे. 


अशातच ग्रामीण भागातून जे विद्यार्थी इंजिनीयरिंगसाठी शहरात आले होते. त्यांना आपल्या गावी परतावे लागले होते. सध्या शिक्षण जरी ऑनलाईन पद्धतीने शिकवल्या जात असले तरी, या विद्यार्थ्यांना अनावश्यक फी भरावी लागत होती. 


एकीकडे आधीच कोरोनामुळे सर्वसामान्य व्यक्तींचे आर्थिक कमरडे मोडलेले असतांना, ते फीस कशी भरणार, असा प्रश्न होता. या पार्श्वभूमीवर उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी इंजिनीयरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक घोषणा केली आहे.


यानुसार आगामी शैक्षणिक वर्षात म्हणजेच 2021-22 या शैक्षणिक वर्षात, शासकीय इंजिनीयरिंग महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना फी व्यतिरिक्त असलेल्या इतर शुल्कामध्ये 16 हजार 250 म्हणजेच अंदाजे 25 टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


शासकीय व शासन अनुदानित स्वायत्त अभियांत्रिकी संस्थेमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिकवणी शुल्काशिवाय इतर शुल्कही भरावे लागते. त्यात ग्रंथालय, जिमखाना व अन्य सुविधांचा समावेश असतो.


परंतू कोरोना काळात विद्यार्थ्यांना महाविद्यालय बंद असल्याने, या सुविधांचा वापर करता आला नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी, त्यांना इतर शुल्कामध्ये सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सामंत यांनी सांगितलं आहेे.

Post a Comment

0 Comments