Ticker

6/recent/ticker-posts

धक्कादायक! बेशुद्ध अवस्थेत असलेल्या रूग्णाचे डोळे उंदराने कुरतडले..

From Twitter

From Twitter

From Twitter


मुंबई | घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात एक धक्कादायक आणि विचित्र घटना घडल्याची माहिती पुढे आली आहे. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात बेशुद्ध अवस्थेत असलेल्या एक रुग्णाच्या डोळ्यांना उंदराने कुरतडले असल्याचे स्पष्ट झाले आहे.


श्रीनिवास यल्लपा असं या 24 वर्षीय तरूण रुग्णाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी यल्लपा याला दम लागत असल्याने राजावाडी पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 


तिथे त्याला डाॅक्टरांनी तपासल्यानंतर मेंदूज्वर, आणि लिव्हर खराब असल्याचे सांगितले होते. मात्र, आज सकाळी नातेवाईकांना रुग्णाच्या डोळ्यातून रक्त येत असल्याचे दिसले. 


त्यांनी त्याच्या डोळ्याची शहानिशा केली असता, त्याच्या डोळ्याला उंदराने कुरतडल्यासारखे दिसून आले. नातेवाईकांनी ही बाब लगेचच रुग्णालयातील नर्सला सांगितली. परंतू नर्सने काहीही ऐकून न घेता, त्यांना उद्धट उत्तरं दिल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.


रुग्णाच्या नातेवाईकांकडून रूग्णालयाच्या कारभारावर निष्काळजीपणाचा आरोप केल्या जात आहे. अशातच आता या प्रकरणावर मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. 


त्यांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहे. रूग्णाच्या डोळ्याच्या पापण्यांचा व आजूबाजूचा भाग कुरतडला गेला आहे. ही गंभीर बाब आहे. असंही महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. 


https://twitter.com/KishoriPednekar/status/1407309524852117512?s=19

Post a Comment

0 Comments