Ticker

6/recent/ticker-posts

अभिनेत्री मंदिरा बेदी यांच्या पतीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

From Facebook


मुंबई | अभिनेत्री मंदिरा बेदी यांचे पती राज कौशल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे. मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने बॉलिवूडमधे शोककळा पसरली आहे. 


एक अभिनेता म्हणून राज कौशल यांनी आपले पाऊल बाॅलीवूडमध्ये ठेवले आणि आपल्या फिल्मी करिअरला सुरूवात केली. 1999 मध्ये अभिनेत्री मंदिरा बेदी आणि राज कौशल यांचा प्रेमविवाह झाला होता. 


कौशल यांनी तीन चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. त्यात ‘प्यार में कभी कभी’, ‘शादी का लड्डू’ आणि ‘अँथनी कौन है’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. 


अभिनेता रोहित रॉय यांनी कौशल यांच्या जाण्याचे दुःख व्यक्त केले आहे. रोहित यांनी सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. ही आतापर्यंत भेटलेली सुंदर व्यक्ती होती. गुड बाय न म्हणताच तो निघून गेला. व्यक्त व्हायला माझ्याकडे आता शब्दच नाही. माझ्या मित्रा, माझ्या भावा, जे घडलं ते खूप वाईट झालं. पुढच्या आठवड्यात भेटू असं म्हणत गेलो आणि आता तो पुढचा आठवडा कधीच येणार नाही, आपल्या भावना रोहित यांनी पोस्टद्वारे व्यक्त केल्या आहे.


कौशल यांच्या पश्चात त्यांची पत्नी मंदिरा, मुलगा वीर कौशल आणि गेल्याच वर्षी त्यांनी एका चार वर्षांच्या मुलीला दत्तक घेतले होते. त्यांच्या जाण्याने सर्वांना धक्का बसला आहे.

Post a Comment

0 Comments