Ticker

6/recent/ticker-posts

अनिल देशमुख यांच्या दोन्ही स्वीय सहाय्यकांना ईडीकडून अटक

From Facebook


मुंबई | परमबीर सिंग यांच्याकडून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर काल अनिल देशमुख यांच्या नागपूरच्या घरी ईडीकडून छापे टाकण्यात आले होते. 


याचबरोबर त्यांच्या वरळीमधील निवासस्थानावरही छापेमारी सुरू होती. या प्रकरणाची अजूनही सखोल चौकशी केल्या जात आहे. अशातच कारवाई दरम्यान ईडीकडून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. यामुळे देशमुख यांच्या अडचणीत नव्याने वाढ होण्याची शक्यता आहे.


संजीव पालंडे आणि कुंदन शिंदे अशी ईडीकडून अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत. पीएमएलए कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 


देशमुख यांच्या आर्थिक व्यवहारांबद्दल केल्या गेलेल्या चौकशी दरम्यान, संजीव पालंडे आणि कुंदन शिंदे यांना प्रश्न विचारले असता त्यांनी सहकार्य केले नसल्याची माहिती पुढे आली आहे. 


या दोघांना आर्थिक अफरातफरी केल्याप्रकरणी अटक केल्याची माहिती ईडीने दिली आहे. याबाबत अनिल देशमुख यांनी आपली बाजू मांडतांना, परमबीर सिंह यांना आयुक्त पदावरुन हटविल्यानंतर माझ्यावर खोटे आरोप केल्या जात आहे. हे आरोप त्यांनी पोलीस आयुक्त पदाच्या खुर्चीवर बसलेले असताना का केले नाही, असा सवाल देखील देशमुख यांनी केला आहे. 


अनिल देशमुख यांना मुंबईतील 10 बार मालकांकडून सलग तीन महिने 4 कोटी रूपये दिले गेल्याची माहिती, ईडीला मिळाली होती. यानुसार ईडीने अनिल देशमुख यांच्या घरी छापा टाकला होता.

Post a Comment

0 Comments