Ticker

6/recent/ticker-posts

डेल्टा प्लस व्हेरिएंटनं टेंशन वाढवलं; राज्यातील निर्बंध पुन्हा कडक होण्याची शक्यता


From Pixabay


मुंबई | कोरोनामुळे देशात मागील वर्षापासून गंभीर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आलेल्या दुस-या लाटेने तर अनेकांची कुटूंब उध्वस्त केलीत, अनेकांना बेरोजगार केले, अनेकांना रस्त्यावर येण्याची वेळ आली. 


आताकुठे ही लाट ओसरू लागली होती, हळूहळू लावण्यात आलेले निर्बंध शिथील करण्यात येत होते. अनेकांचे आयुष्य काटेरी वाट ओलांडून सुटकेचा निश्वास घेत होते. अशातच डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे आणि येणा-या तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा लाॅकडाऊन होते की काय अशी भिती निर्माण होत आहे. 


डेल्टा प्लस या व्हेरिएंटचे आतापर्यंत देशात एकूण 40 रूग्ण सापडले आहेत. चिंतेची बाब अशी की, यातील सर्वाधिक रूग्ण हे महाराष्ट्र राज्यात सापडले आहेत. 


म्हणजेच एकूण 21 रूग्ण हे एकट्या महाराष्ट्रात आढळून आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्यातील निर्बंध पुन्हा कडक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 


याआधी कोरोनाच्या ब्रेक द चेनसाठी 20 दिवसांपूर्वी राज्य सरकारने अनलॉकचा निर्णय घेतला होता. मात्र डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका, त्याचप्रमाणे काही बाजारपेठांमध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन होतांना दिसून येत आहे. 


या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा निर्बंध कडक होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सरकारकडून सध्या, दुकानांच्या वेळा पुन्हा एकदा कमी करण्यात येऊ शकतात, असा इशारा देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments