Ticker

6/recent/ticker-posts

बिग बाॅस मधील या अभिनेत्रीला केली पोलिसांनी अटक..



नाशिक | पोलिसांकडून टाकण्यात आलेल्या हाय प्रोफाईल रेव्ह पार्टीतील छाप्यात अनेक मोठ्या व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. नाशिकातील इगतपुरीत सुरू असलेल्या या रेव्ह पार्टीत एका ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्रीसह 22 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 


मलायका अरोराची लूक-अलाईक अशी ख्याती मिळवलेली ही अभिनेत्री सर्वांना परिचित असलेली डान्सर हीना पांचाळ आहे. यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. 


शनिवारच्या मध्यरात्री जवळपास 2 च्या सुमारास नाशिक पोलिसांकडून इगतपुरीत असलेल्या 'स्काय ताज व्हिला' या बंगल्यावर धाड टाकण्यात आली होती. यावेळी हीनासह मराठी आणि दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील अभिनेत्री, एक परदेशी महिला, आणि दोन महिला कोरिओग्राफर यांनाही या हाय प्रोफाईल पार्टी दरम्यान अटक करण्यात आली आहे. 


या पार्टीत नशेत बेधुंद होऊन सर्वजण नाचगाणी, हुक्का आणि ड्रग्जचे सेवन करत होते. या पार्टीची पोलिसांना गोपनीय पद्धतीने माहिती मिळताच, पोलिसांनी धाड टाकून ही पार्टी उधळून लावली. 


या छापेमारीत पोलिसांनी 10 पुरुष आणि 12 महिला अशा एकूण 22 जणांना ताब्यात घेतले आहे. मात्र काही जणांनी यातून पळ काढला. पोलिसांनी या व्हिलेत काम करणा-या स्टाफला देखील ताब्यात घेतले आहे.


बिग बॉस फेम हीना पांचाळ ही बिग बॉस मराठी च्या दुसऱ्या पर्वात वाईल्ड कार्ड एन्ट्री घेऊन सहभागी झाली होती. यात महाअंतिम भागा आधीच तिचा प्रवास संपला होता.

Post a Comment

0 Comments