Ticker

6/recent/ticker-posts

अखेर काही दिवसांनी होणार अनिल देशमुखांची तुरूंगात रवानगी



मुंबई | राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीकडून छापे टाकण्यात आले आहे. त्यांच्या निवासस्थानावरील ही महिन्यानंतरची दुसरी धाड आहे. यापूर्वी देखील सीबीआयकडून देशमुख यांच्या घरावर छापा टाकण्यात आला होता. 


ईडीकडून केल्या गेलेल्या या कारवाईवर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या संदर्भात त्यांनी एक ट्विट केलं आहे. ज्यात त्यांनी, अनिल देशमुखांची काही दिवसांनी तुरूंगात रवानगी होणार आहे, असे म्हटले आहे. यावेळी सोमय्या यांनी मंत्री अनिल परब यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. 


आज अनिल देशमुखच्या घरी ईडीचे छापे पडले, काही दिवसांनी जेलमधे रवानगी होणार. देशमुख यांनी घोटाळ्याचा पैसा कोलकात्यातील कंपन्यांद्वारा स्वतःच्या कंपन्यामधे वळविला. छगन भुजबळ हे अशाच प्रकारच्या घोटाळ्याचा पर्दाफाश झाल्याने 3 वर्ष जेल मधे होते. असे खडेबोल सोमय्या यांनी आपल्या ट्विट द्वारे म्हटले आहे.


याआधी परमबीर सिंह यांच्याकडून अनिल देशमुख यांच्यावर वसुली करण्याच्या आदेशाचा गंभीर आरोप करण्यात आला होता. त्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. 


ईडीकडून देशमुखांच्या नागपुरातील घरावर छापा टाकण्यात आला आहे. यावेळी केंद्रीय सुरक्षा यंत्रणा सीआरपीएफचे जवान मोठ्या प्रमाणात तैनात होते.




Post a Comment

0 Comments