Ticker

6/recent/ticker-posts

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम करण मेहरा नव्याने संकटात



मुंबई | 'ये रिश्ता क्या कहलाता है' ही मालिका अनेक घरातील आवडती मालिका आहे. या मालिकेतील महत्वाच्या कलाकारांपैकी एक असलेला करण मेहरा हा अल्पावधीतच लोकप्रिय झाला होता. आता मात्र पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 


आपल्या पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी गोरेगाव पोलिसांकडून त्याला अटक करण्यात आली होती. या घटनेमुळे टीव्ही इंडस्ट्रीमध्ये एकच खळबळ उडाली होती. अशातच आता पुन्हा एकदा करण मेहराच्या अडणींमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. 


कारण यावेळी त्याच्या पत्नीने त्याच्यावर दुसरा गुन्हा नोंदवला आहे. याआधी निशा रावलने करणच्या विरोधात गोरेगाव पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. 


तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी करणवर गुन्हा दाखल केला होता. अशातच आता निशा मेहरा हिने करणवर तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केल्याचा, आरोप करत गुन्हा नोंदवला आहे.


याचबरोबर त्याच्या कुटूंबातील सदस्य अजय मेहरा, बेला मेहरा आणि कुणाल मेहरा या तिघांवरही तिने मारहाण आणि जाणीवपूर्वक त्रास दिल्याचा आरोप केला आहे. 


तिच्या बँक अकाउंटमधून करण ने तब्बल एक कोटींपेक्षा अधिक रक्कम काढल्याचा आरोप देखील निशाने करणवर केला आहे. त्यामुळे करणच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Post a Comment

0 Comments