Ticker

6/recent/ticker-posts

कोरोनाकाळात नाशिकातील 69 अल्पवयीन मुली बेपत्ता; असं काय घडलं



नाशिक | कोरोनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. काही लोकांनी तर सततच्या लाॅकडाऊनमुळे तर काहींनी बेरोजगारीमुळे आत्महत्या केली. अनेकजण आजही जगण्यासाठी धडपड करत असल्याचे विदारक चित्र बघायला मिळत आहे. 


नाशिक जिल्ह्यात मात्र या कोरोना दरम्यान एक विचित्र घटना घडल्याची बाब पुढे आली आहे. जिल्ह्यातील तब्बल 69 अल्पवयीन मुली कोरोना काळात बेपत्ता झाल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 


नाशिक जिल्ह्यातील या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ माजली आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या काळात अनेकजण पर्याय नसल्याने मोबाईलच्या आहारी गेल्याचेही निष्पन्न झाले आहे. त्याचबरोबर सोशल मीडियाचा अतिवापर केल्यामुळे मुली घरातून निघून गेल्या असाव्यात, असा दावा देखील करण्यात येत आहे.


नाशिक पोलिसांना तपासादरम्यान 69 मुलींपैकी 07 मुलींचा थांगपत्ता लागला आहे. याप्रकरणी मानसोपचार तज्ज्ञांनी केलेल्या वक्तव्यानुसार, आज पालकांनी आपल्या पाल्यांशी संवाद वाढविण्याची गरज आहे.


एवढ्या मोठ्या प्रमाणात मुली बेपत्ता झाल्याने प्रशासनाकडून आणि नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.


दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलींची शोध मोहीम ही अजूनही सुरू आहे. परंतू या सर्व मुली नेमक्या कुठल्या कारणामुळे बेपत्ता झाल्या, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. याशिवाय या सर्व मुली अल्पवयीन असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment

0 Comments