Ticker

6/recent/ticker-posts

धक्कादायक! 10 मिनिटांच्या अंतरात नर्सकडून महिलेला देण्यात आले चक्क 3 लसीचे डोस




ठाणे | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता हळूहळू कमी होऊ लागली आहे. परंतू येणा-या तिस-या लाटेपासून बचाव करण्यासाठी शासनाकडून लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. परंतू लसीकरणाच्या या मोहिमेत कुठे भेसळ केल्या जात आहे तर कुठे बेजबाबदारपणा दिसून येत आहे. 


त्यामुळे शासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. ठाणे महानगरपालिकेच्या घोडबंदर मधील एका लसीकरण सेंटरवर एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. 


जीथे परिचारिकेकडून लस घेण्यासाठी आलेल्या एका महिलेला 10 मिनिटांच्या अंतराने चक्क 3 लसीचे डोस देण्यात आले आहे. यामुळे लसीकरण केंद्रावर चांगलीच धुमाकूळ उडाली होती. एकापाठोपाठ तीन लसी दिल्यामुळे या महिलेला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. 


याबाबत आयुक्त विपीन शर्मा यांना प्रसार माध्यमांकडून विचारणा करण्यात आली असता, मी यावर काहीच बोलू शकत नाही, असं बोलून त्यांनी पळ काढला आहे. 


महिला परिचारिकेने देखील याबाबत काहीच उत्तर दिले नसल्याचे, सांगण्यात येत आहे. लसीचे तीन डोस घेतल्यानंतर बाहेर पडलेल्या या महिलेने याबाबत स्थानिक नगरसेविकेला माहिती दिली. त्यानंतर या नगरसेविकेकडून महानगरपालिकेच्या डॉक्टरांना जाब विचारला असता, ठाणे महापालिकेकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments