Ticker

6/recent/ticker-posts

खैरे कुटुंबावर कोरोनाने घातली झडप

अख्ख कुटूंब मातीमोल झालं......




अकोला | संपूर्ण देशाची अवस्था ही कोरोनामुळे दयनीय झालेली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकोपाने अनेकांचे कुटुंब उध्वस्त केले. कोरोना कधी संपेल या प्रश्नाचे उत्तर जगाच्या पाठीवर सध्याच्या परिस्थितीत कुणालाही देणे शक्य नाही. मृत्यूच्या या खेळाने सर्वच त्रस्त आहे. रोजच्या कुठल्या ना कुठल्या घटनेने मन दुःखाने पिळून निघत आहे. 


अशीच एक घटना काल अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे घडली. कुटूंबातील सर्व व्यक्तींवर कोरोनाने झडप घातल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे. 


समाज क्रांती आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मुकुंद खैरे यांच्या कुटुंबातील तीनही व्यक्तींचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या परिचितांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बुधवारी 5 मे रोजी प्राध्यापक मुकुंद खैरे यांचं कोरोनावर सुरू असलेल्या उपचारादरम्यान निधन झालं. 


गेल्या पंधरा दिवसात कुटुंबातील तीन सदस्याचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यांची पत्नी छाया खैरे यांचं 19 एप्रिल ला कोरोनाने निधन झालं. तर 2 मे रोजी त्यांच्या 32 वर्षीय वकील मुलीचे शताब्दी खैरे हिचा देखील कोरोनाने मृत्यू झाला. 


प्रा. मुकुंद खैरे हे समाज क्रांती आघाडीचे संस्थापक अध्यक्ष होते. 6 डिसेंबर 1991 मध्ये त्यांनी या संघटनेची स्थापना केली होती. मूर्तिजापूर येथे असलेल्या गाडगेबाबा महाविद्यालयातून ते राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख म्हणून निवृत्त झाले होते.


त्यांनी दलित आणि आदिवासी यांच्या प्रश्नांवर समाज क्रांती आघाडीच्या माध्यमातून व्यापकपणे भूमिका मांडली होती. त्यांच्या नेतृत्वात अनेक जिल्ह्यात दलित व आदिवासींच्या प्रश्नांवर मोर्चे निघाले होते. 


2014 मध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी पंचवीस हजारावर मते घेतली होती. रिपब्लिकन चळवळ ही केवळ दलितांपुरती मर्यादित न राहता तिचं स्वरूप व्यापक व्हावं, यासाठी ते नेहमी कार्यरत होते.

Post a Comment

0 Comments