Ticker

6/recent/ticker-posts

10 वर्षांनी झालेलं पहिलं मूल कोरोनाने दगावलं

From Pixabay


अकोला | कोरोनाने अनेक मुलांचे पालक हिरावून घेतले तर अनेक चिमुकल्यांना त्यांच्या आई वडिलांपासून हिरावून घेतले. अकोल्यातील अशाच एका चिमुकलीवर कोरोनाने झडप घालून कुटूंबावर दुःखाची काळी छाया टाकली आहे. गेल्या अनेक वर्षानंतर झालेल्या या एकुलत्या एक चिमुकलीला कोरोनाने हिरावून घेतल्याने कुटूंबीयांना अश्रु अनावर झाले आहे. 


लग्नाला दहा वर्षे होऊनही खान कुटूंबात पाळणा हलला नव्हता. परंतू दहा वर्षानंतर मात्र त्यांच्या घरात नव्या पाहूणीचे आगमन झाले. खान कुटूंबात आनंदाची नवी आशा पल्लवित झाली. हसत खेळत चिमुकली सहा महिन्याची झाली.


अचानक काही दिवसांपूर्वी तिला ताप आला. ताप बरा न झाल्याने तिला शहरातील मेडिकल कॉलेजमध्ये भरती करण्यात आले. कोरोनाची शक्यता नाकारता येत नसल्याने, तिची अँटिजेन टेस्ट करण्यात आली. त्यात या चिमुकलीचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आला. 


तिला कोरोना झाल्याचं कळताच खान कुटूंबीयांना धक्काच बसला. डाॅक्टरांनी ताबडतोब चिमुकलीवर उपचार सुरू केले. मात्र उपचारादरम्यान तिच्या ह्रदयाचे ठोके थांबले. 


जीएमसी मधील बालरोग तज्ज्ञ डॉ. विनीत वरठे यांनी सांगितल्याप्रमाणे, या मुलीला जन्मजात हृदयाचा आजार होता. त्याचबरोबर ती खूपच कमजोर असल्याने उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला. कोरोनापुढे सर्वजण हतबल आहेत, तिला वाचविण्यासाठी आम्ही अनेक प्रयत्न केले पण ते निष्फळ ठरले. तिच्या जाण्याचे दुःख आमहालाही असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments