Ticker

6/recent/ticker-posts

सावित्रीबाई फुले विचार मंचच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्सहात साजरी



पुसद:-येथे सावित्रीबाई फुले विचार मंचाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौक पुसद येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून शहर पो स्टे ठाणेदार श्री पांडूरंगजी फाडे, संस्थापक अध्यक्ष पॅंथर देवाभाई जगताप भिम पॅंथर न्यायाची डरकाळी सामाजिक संघटणा पुसद,सुरज कुरील नेता मोची समाज,गजनन नाळे अध्यक्ष सावित्रीबाई फुले विचार मंच, डॉ.शंकरराव दळवे, संतोष आंभोरे सामाजिक कार्यकर्ता, शैलेश दळवेसर राष्ट्रीय दिव्यांग संघ अध्यक्ष, गिरेसर,नारायण वडसकर,यांची विशेष उपस्थिति होती सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन मा.ठाणेदार श्री पाडूरंगजी फाडे व उपस्थित सर्व पाहूण्याच्या हस्ते करण्यात आले त्या नंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे संस्थापक अध्यक्ष पॅंथर देवाभाई जगताप भिम पॅंथर न्यायाची डरकाळी सामाजिक संघटणा व रिताताई जगताप भिम पॅंथर महिला आघाडी अध्यक्षा यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा देऊण विचार मंचाचे अध्यक्ष गजानन नाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्या नंतर गजानन नाळे व त्यांच्या पत्नी सौ अनुसया गजानन नाळे यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन शहर पो स्टे ठाणेदार श्री पाडूरंगजी फाडे यांच्या हस्ते छञपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊण सत्कार करण्यात आला.

त्या नंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणीक व सामाजिक केलेल्या क्रांतीच्या जीवन चरित्रावर ठाणेदार श्री पांडूरंगजी फाडे यांनी आपले विचार व्यक्त केले त्या नंतर संस्थापक अध्यक्ष  पॅंथर देवाभाई जगताप यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आपले विचार व्यक्त केले ते म्हणाले कि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी पूणे येथील भीडेवाड्यातून महिलांसाठी पेटूऊन ठेवलेली शैक्षणिक ज्योत तेवत ठेवण्यासाठी त्यांचा आदर्श घेऊन तेवत ठेवावे या साठी प्रर्यंन करणे काळाची गरज आहे या क्रार्यक्रमाचे सुञसंचालन सदानंद तायडे राष्ट्रीय दिव्यांग संघ सचिव यांनी केले तर आभार प्रदर्शन विचार मंचाचे अध्यक्ष गजानन नाळे यांनी केले या क्रार्यक्रमासाठी विचार मंचाचे राज गिरे,मूकुंद पाचपोहर,शूभम कुलर्कणी,निलेश वाघमारे, माणिक निचत,शनि गिरे यांच्या सह असंख्य कर्यक्रताने सहभाग घेतला व तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विचार मंच च्या महिला मंडळ उपस्थित होते.

जिल्हा प्रतिनिधी राजेश ढोले

Post a Comment

0 Comments