पत्रकारांच्या विविध मागण्यासाठी व्हाईस ऑफ मिडीयाचे लाक्षणीक आंदोलन यशस्वी
अकोला : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत येत असलेल्या पत्रकरांच्या समस्या ह्या स्थानिक पातळीवर सोडविल्या जातील व इतर मागण्याबाबत शासन दरबारी पाठपुरावा केला जाईल असे प्रतिपादन व्हाईस ऑफ मिडीयाचे प्रतिनिधींना अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अजित वुंâभार यांनी दिले.
व्हाईस ऑफ मिडिया पत्रकार संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या आदेशावरून, प्रदेशाध्यक्ष विनोद बोरे यांच्या मार्गदर्शनात, विदर्भ अध्यक्ष (सा.विंग) शंकर जोगी, विभागीय अध्यक्ष संतोष धरमकर व जिल्हाध्यक्ष पंजाबराव वर यांचे नेतृत्वात दि. ४ जुलै २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी १ दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले होते. मागण्या पढील प्रमाणे आहेत.
१) आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये दैनिकाप्रमाणेच साप्ताहिकांनाही जाहिरातीचे वितरण व्हावे. २) साप्ताहिक वृत्तपत्राची द्वीवार्षिक पडताळणी पाच वर्षात करा ३) साप्ताहिक वृत्तपत्राच्या जाहिरातीची दरवाढ करावी ४) अधिस्वीकृती धारक पत्रकारांना एसटी महामंडळात परिवारासह सवलत देण्यात यावी. ५) रेल्वे प्रवासासाठी अधिस्वीकृती धारकांना पुन्हा सवलत सुरू करावी. ६) पत्रकारांसाठी आरोग्य विमा व विनामुल्य उपचाराची सवलत देण्यात यावी. ७) आर एन आय कडून नवीन नियमावलीनुसार लादण्यात आलेल्या जाचक अटी रद्द कराव्यात.८) जिल्ह्यातील सर्व न.प. व नगर पंचायत, महानगर पालिका, ग्रामपंचायत यांच्या जाहीराती शासकीय रोस्टर प्रमाणे देण्यात याव्यात व यादीवर नसलेल्या नियमीत साप्ताहिकांना पुर्वीप्रमाणे जाहीरात देण्यात यावी या मागण्या संदर्भात निवेदन ाqजल्हाधिकारी अजित कुभांर अकोला व जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार यांना देण्यात आले. ाqजल्हाध्यक्ष पंजाबराव वर, विदर्भ अध्यक्ष शंकर जोगी, विभागीय अध्यक्ष संतोष धरमकर, संघपाल सिरसाट, तुषार हांडे, समीर एन. खान, अजय विजय वानखडे, सुनील सु. गवई, प्रजानंद उपर्वट, एजाज अहेमद खान, अर्जून घुगे, डॉ. धनंजय नालट (अकोला नायक), संजय निकस, संजय पाठक, रोशन दुंगे, समाजसेवक उमेश इंगळे, अनिल माळवे, मुकेश ढोके, डॉ. एम.एन. कुद्दुस, डी. जे. वानखडे, रमेश समुद्रे, सैय्यद जमीर (जेके), संदीप देशमुख, मनोहर मोहोड, अबरार अहमद, दयानंद इंगळे, गोवर्धन मोरे, मिलिंद बनसोड आदींच्या सह्या आहेत. पत्रकारांच्या आंदोलनाला समाज क्रांती आघाडी सामाजिक संघटना व वृद्ध कलावंत संघटनांचे प्रतिनिधींनी पाठींबा दर्शविला.
0 Comments