Ticker

6/recent/ticker-posts

खाकी वर्दीतील 'तेजस्वी तारा' : एसपी सुनीलजी कडासने



नमन तुम्हाला,तुम्हीच रक्षणकर्ते,तुम्हीच गगनदिशा, आधार, निर्धार तुम्हीच ओमकार,तुम्हीच सकल आशा!

.. आयुष्याच्या क्षितीजावरती मावळणारा सुर्य जर उद्याची पहाट घेऊन उगवणारा असेल तर त्याच्या पहिल्याच किरणांत मला खाकी वर्दीतील सृजनशिलतेचे क्षितीज असलेल्या व्यक्तीमत्त्वात उत्कर्षाचा सोनेरी उष:काल दिसतोय. 
ज्यांच्या चेहऱ्यावर सदोदित अध्यात्मिक ज्ञानाचं दिव्य तेज विलसत असतं. ओथंबून झिरपत असतं. आणि, ज्यांच्या रसाळ वाणीतून अमृतधारा उत्स्फूर्तपणे वाहत असते. ज्यांच्या ओघवत्या शैलीने अनेकांच्या मनावर गारूड केलेलं आहे, असे आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे खाकी वर्दीतील सृजनशिलतेचे नितळ क्षितीज असलेले बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक सुनीलजी कडासने सर यांची ज्ञानाच्या अमृतकणांनी 'तेजस्वी मुद्रा' उमटलेली आहे. अशा खाकी वर्दीतील सृजनशिलतेचे क्षितीज असलेल्या व्यक्तीमत्त्वावर वाढदिवसाच्या मंगलमय शुभदिनी लिहावे तेवढे थोडेच आहे. वाढदिवसाच्या ओंजळभर फुलांच्या शुभेच्छा उदंड दिर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...



ज्यांच्या मौखिक निरुपणामुळे प्रत्येकाला योग्य दिशा मिळते, त्यांच्या बद्दल सांगायचं म्हटलं तर 'अफाट' या एका शब्दात एसपी सुनीलजी कडासने यांची प्रेरणादायी कहाणी सांगता येईल पण लिहायचं ठरवलं तर मात्र, हजारो पानांचे खंड लिहुनही त्यात साहेबांच व्यक्तिमत्त्व पकडता येईलच याची खात्री नाही.
सृजनशिलतेचे क्षितीज असलेल्या व्यक्तीमत्त्वात खरं तर किती गुणाचे पैलू विधात्याने भरलेले आहेत. ते माझ्या सारख्या गावखेड्यातील सर्वसामान्य पत्रकाराच्या लेखणीतून शब्दाचा फुलोरा केवळ लोखंडाच्या निपातून उतरलेल्या शाईनं जाड्या भरड्या कागदावर तेजोमय कर्तृत्व, वकृत्व, नेतृत्व आणि दातृत्वावर लिहिणं म्हणजे उगवत्या सूर्यप्रकाशाला कंदील दाखविणे होऊ शकते. मी माझ्या लेखणीतून एक दोन नव्हे तर शेकडो व्यक्तिमत्त्वचा ओजस्वी आणि तेजस्वी प्रेरणादायी प्रवास लिहून त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिमळ कल्पक शब्दमोत्यांनी फुलविला. मात्र,आज ज्या कुटुंबातचं सिद्धहस्त लेखणीतून अमृतवाणीने अनेक पुस्तके, ग्रंथ, लिहिले आहेत. या कुटुंबात एक दोन नव्हे तर कित्येकतरी विविध भाषा अवगत असून प्रभूत्व आहे.अशा महान वकृत्वाच्या ज्ञानपोईवर कार्यकर्तृत्वाचा चढता आलेख लिहितांना माझे हात थरथरत आहेत. कारण ना मी लेखक आहे,ना साहित्यक आहे. त्यामुळे माझ्या शब्दराजंणात शब्द कमी पडत आहेत. प्रसन्नवदन ,रसाळ ,ओघवती वाणी, संस्कार भाषेवर प्रभुत्व असुनही सहजसोप्या शैलीत अध्यात्म, साहित्य ह्या विषयावर अभ्यासपूर्ण प्रवचने, व्याख्याने आणि हिंदी -उर्दुतून ह्यावर विवेचन आणि भावगर्भ निवेदन करणाऱ्या म्हणून ख्याती आहे.


 आज समाजाच्या उन्नतीसाठी चंदणासारखे झिजून कार्यकर्तृत्वाचा फुलासारखा परिमळ चहूबाजूंनी दरवळत आहे. त्यामुळे एसपी सुनीलजी कडासने सर आपल्या कर्तृत्वाने, वकृत्वाने आणि नेतृत्वाने एक सृजनशिलतेचे नितळ क्षितीज असुन चालतं बोलतं संस्कारपीठच आहे. त्यांच्या वागण्यात शालीनता, बोलण्यात माधुर्य आणि नजरेत सज्जनांच्या रक्षणासाठी ममत्व भरलेलं आहे. त्यांच्या मुखातून येणारा प्रत्येक शब्द पवित्र आणि वाक्य सुवचनच असतं. सरांच्या सहवासात आलेल्याच्यां मनावर तर अध्यात्मिक भक्तीचं पीकच जणूकाही उगवलेले आहे. आणि चैतन्याच्या वरप्राप्तीमुळे जणूकाही सर्वांनाच सुगंध देत राहतात. सृजनशिलतेच्या नितळ क्षितीजात 'तेजस्वी तारा' कोणी बघितला आहे की नाही मला माहित नाही, पण मी खाकी वर्दीतील तेजस्वी तारा' बघितला आहे. जे सदैव सज्जनाचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटिबद्ध राहुन कर्तव्यदक्ष असतात. अशा जिगरबाज, डॅशिग आणि तितकेच वर्दीत दडलेले संवेदनशील आयपीएस अधिकारी कोणावर विनाकारण अन्याय होणार नाही आणि खरा गुन्हेगार कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाही हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्ये अनेकांना भावते. एसपी सुनीलजी कडासने सर यांनी राज्याच्या अनेक जिल्ह्यात आपल्या ओजस्वी-तेजस्वी कर्तव्यदक्ष कामाचा  ठसा उमटवला आहे. थेट जनतेमध्येच मिसळून गुन्हेगारांचा बिमोड करत असल्याने सज्जनांच्या हृदयात आदरभाव निर्माण झाला आहे. पोलीस दलातील जिल्हाच्या सर्वोच्च पदावर आणि ज्ञानाच्या इतक्या उत्तुंग शिखरावर विराजमान असूनही तसूभरही अहंकार नाही, नव्हे त्याचा लवलेश नाही. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी, कुठल्याही गोष्टीचा मी पणा नाही. मी माझे अजीबात नाही. कुणी आपल्यावर स्तुतीसुमने उधळावी प्रशंसा करावी हि अपेक्षाही नाही. अत्यंत सात्विक शांत बोलणे. तर अमोघ ओघवती संस्कारांची अमृतसंजीवनी देत असतात. आज एक यशस्वी व्यक्तिमत्व म्हणजे कर्तव्यदक्ष खाकी वर्दीतील सृजनशिलतेचे क्षितीज असलेले व्यक्तिमत्त्व सुनीलजी कडासने साहेब  तरुणांचे हे प्रेरणास्थान बनलेले आहे. त्यांच्या कडे पाहून युवकांना आपणही पोलीस दलात जाऊ शकतो असा विश्वास वाटतो. माणसाच्या अंगी असलेली जिद्द आणि इच्छाशक्तीच्या जोरावर त्याला कोणतेही स्वप्न पूर्ण करण्यापासून अडवू शकत नाही मेहनत केली तर यश हमखास पाहायला मिळतं प्रगतीसाठी शिक्षण हाच एक मोठा पर्याय आहे. त्यासाठी परिस्थितीला न जुमानता अभ्यासाची कास धरून ध्येय गाठणे सहज शक्य होऊ शकते हे सिद्ध  होऊ शकते असे अमृतमय विचार आयपीएस सुनीलजी कडासने सदोदित मांडत असतात.
सोबतच गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढत अतिशय कठोरपणे कायद्याची अंमलबजावणी केली आहे या हद्दीत गुन्हेगारीने तोंड वर काढले होते परंतु कायद्याचा अवलंब करत अनेक मुसक्या आवळल्या ने गुन्हेगारीवर अंकुश आला आहे. कायद्यात रहाल तर फायद्यात राहाल असा संदेश देत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील असो की बाजूच्या हद्दीत खुनाची घटना असेल या सर्व गुन्ह्यांची उकल करताना अतिशय शिस्तबद्ध तपास यंत्रणा राबवत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
गुन्ह्यांचा तपास करताना शिस्तप्रिय खाकीचा दबदबा निर्माण करून पोलीस दलाची मान उंचावेल अशा प्रकारचे कार्य अत्यंत संवेदनशील असून चोवीस तास अलर्ट राहावे अशा सुचनामार्गदशनही ठाणेदारांना करत असतात. अतिशय समयसूचकता दाखवत कायदा आणि सुव्यवस्था याची कोठेही हेळसांड होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेऊन आपले अतुलनीय धैर्य ,धाडस गुन्हेगारांना जेरीस आणण्यासाठी त्यांना पकडण्यासाठी रचला जाणारा सापळा कुठल्याही गुन्ह्याची लवकरात लवकर उकल काढून गुन्हेगारांना शासन करण्यासाठी रचलेली सुरक्षित व्युहरचना नागरिकांचे रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून समाजाच्या संरक्षणासाठी तत्परता आणि मार्गदर्शन करत असतात. खाकी वर्दीतील आपल्या एका कर्तव्यनिष्ठ व गुन्हेगारांचे कर्दनकाळ ठरलेल्या ठाणेदारांना कौतुकाचे मानपत्र देत असतात. सामाजिक एकात्मतेचा संदेश देत सर्व धर्म समभाव वसा अंगीकारत जातीय सलोखा निर्माण करीत त्यांनी कधीही जाती धर्म लहान-मोठा गरीब-श्रीमंत असा कोणताही भेदभाव न जुमानता आपल्या कर्तव्यात स्मितभाषी, प्रेमळपणे तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमीवर लोकप्रियतेचेसह खाकीवर्दीचा दबदबा निर्माण केला आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यात ही यशस्वी झाले आहेत. चाणाक्ष बुद्धिमत्तेच्या आधारे अनेक चोरी खुनी गुन्ह्यांचा त्यांनी सोक्षमोक्ष लावला आहे. 
जिल्हातील सर्व गावांमध्ये सर्वधर्मीय सण होळी दीपावली, दसरा, रमजान, बकरीईद, मोहरम, शिवजयंती, भीम जयंती, जागतिक आदिवासी दिन, गणेश उत्सव, नवरात्र उत्सव,  सहभागी होऊन तसेच लहान मोठ्यांना तसेच पत्रकार, समाज सेवक राजकारणी सामाजिक कार्यकर्ते सर्वांना आपलासा वाटणारे खाकी वर्दीतील सृजनशीलतेचे क्षितीज असलेल्या सुनीलजी कडासने यांनी जन माणसाच्या हृदयात स्थान मिळवले आहे. ज्या समाजात आपला जन्म झाला त्या समाजाचे ऋण फेडणे हे आपले अध्यकर्तव्य समजून ते नेहमी सकारात्मक दृष्टीने सर्व समाजासाठी काम करतात. अशातच कृतिशील विचार खाकीवर्दी त्यांनी रुजवीत माणुसकीचा परिचय दाखवत अनेक गोरगरिबांना मदतीचा हात देऊन आदर्श निर्माण केला, सामाजिक बांधिलकी जोपासत माणुसकीचा धर्म निभावत आहेत. यांच्या संवेदनशील मनातून माणुसकीचा झरा पाझरतो त्यामुळे त्यांच्या कार्याचा सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. या कर्तव्यनिष्ठ खाकी वर्दीतील सृजनशीलतेचे क्षितीज असलेल्या तेजस्वी, आणि ओजस्वी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असलेल्या साहेबांच्या कर्तव्यदक्षतेला त्रिवार “सॅल्लूट”…!
हिऱ्याप्रमाणे चमकत राहो
आपल्या कर्तृत्वाची ख्याती, स्नेह जिव्हाळ्याने वृद्धिंगत व्हावी मनामनाची नाती.या जन्मदिनी उदंड आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा!

*✒️ संतोष अवसरमोल (पत्रकार)*
*मु.पो.घाटबोरी,ता.मेहकर ,जि.बुलढाणा*
*मो:-9689777129*

Post a Comment

0 Comments