Ticker

6/recent/ticker-posts

महिलांमुळे संस्कृतीचे जतन... विदर्भ सांस्कृतिक मंच आणि बुलडाणा अर्बन आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त महिलांकरिता विविध सांस्कृतिक स्पर्धेच्या कार्यक्रमा मध्ये डॉ सुकेश झंवर यांचे प्रतिपादन.... बुलढाणा.

विदर्भ सांस्कृतिक मंच आणि बुलढाणा अर्बनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त  दिनांक 11 मार्च रोजी महिलांकरिता विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन सहकार विद्या मंदिर येथे केले होते. संस्कृती जतन करण्याचे संवर्धन करण्याचे काम मुख्यत्वे स्त्रिया करतात आणि त्याकरिता त्यांना अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून मंच उपलब्ध करून देणे फार गरजेचे आहे. असे प्रतिपादन कार्यक्रमाचे उद्घाटक आणि अध्यक्ष बुलडाणा अर्बनचे चिफ मॅनेजिंग डायरेक्टर सुकेश जी झंवर यांनी याप्रसंगी केले. तसेच पुष्पगुच्छ देऊन समस्त महिलांना महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या याप्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून डॉ. माधवी जवरे त्याचप्रमाणे डॉ.मंजुषा जाधव सामाजिक कार्यकर्ता अनिता कापरे, अभिनेत्री अनुराधा भावसार अलकाताई खांडवे आणि इतर महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.

 सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. महिलांनी स्वास्थ्याकडे सुद्धा लक्ष द्यायला हवं कारण महिला स्वस्थ तर कुटुंब स्वस्थ अशा शब्दात डॉ. माधवी जवरे यांनी आपले मत या प्रसंगी मांडले.

तसेच आयुर्वेदाच्या माध्यमातून बहुतेक आजारांवर मात करता येते महिलांनी आयुर्वेदा संदर्भात माहिती जाणून घ्यावी अशा भावना नॅचरोपॅथी डॉक्टर मंजुषा ताई जाधव यांनी व्यक्त केल्या.

गीत गायन स्पर्धेमध्ये खुल्या गटातून आसावरी लोखंडे आम्रपाली अवसरमोल आणि दुर्गा शर्मा यांना अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळाला त्याचप्रमाणे शालेय वयोगटामध्ये शताक्षी राहुल कुलकर्णी राधिका जयस्वाल यांना प्रथम व द्वितीय क्रमांक मिळाले तर तृतीय क्रमांक अवनी पाटील आणि कल्याणी इंगळे यांना विभागून देण्यात आला गीत गायन स्पर्धेत शालेय वयोगटामध्ये सहकार विद्या मंदिर च्या विद्यार्थिनींनी बाजी मारली.एकपात्री अभिनय स्पर्धेत खुल्या वयोगटामध्ये शालिनी सुखधने, पुष्पा उपाध्ये- गुळवे अनिता कापरे, यांना अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळाला. त्याचप्रमाणे नृत्य स्पर्धा शालेय वयोगटामध्ये तन्वी पांडव ,अंकिता गळपे आणि आराध्या सदावर्ते यांना अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळाला नृत्य स्पर्धेत खुल्या वयोगटामध्ये वैष्णवी चोपडे ,स्नेहा सावजी आणि पूजा खिल्लारे यांना अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळाला.

पल्लवी पटले यांनी मंगळागौरचे पारंपारिक नृत्य करून उपस्थित प्रेक्षकांची मने काबीज केली त्याचप्रमाणे सहकार विद्या मंदिर च्या शिक्षकांनी अप्रतिम असं समूह नृत्य या कार्यक्रमात प्रसंगी सादर केले. कार्यक्रमाची प्रस्तावना विदर्भ सांस्कृतिक मंचचे अध्यक्ष प्रेम इंगळे यांनी केली,आणि सूत्रसंचालन अनुराधा भावसार आणि विदर्भ सांस्कृतिक मंचचे सदस्य गणेश घोरपडे, शैलेश नाटेकर, यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments