Ticker

6/recent/ticker-posts

श्री स्वामी समर्थ प्रगट दिन उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

 



बुलडाणा.  स्वामी भक्तांना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांचा प्रगट श्री क्षेत्र खेर्डी  येथे भव्य दिव्य स्वरूपात साजरा होणार आहे.श्री. स्वामी समर्थ खंडाळापासून पश्चिमेस दीड किलोमीटर अंतरावर खेर्डी येथे असून नवीन रस्ता येळगाव  सव रुईखेड मार्ग सात किलोमीटर अंतरावर आहे. सोमवार दिनांक 20 मार्च 2023 पासून शुक्रवार दिनांक 24 मार्च 2023 पर्यंत चारही दिवस पूजा अभिषेक उपासना आणि नामसंकीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने दैनंदिन कार्यक्रमात सोमवार ते गुरुवार रुद्राभिषेक गुरुवार दिनांक 23 मार्च सायंकाळी ठीक 4 वा. स्वामींचा भव्य पालखी सोहळा असुन या सोहळ्याला पंचक्रोशीतील टाळकरी यांनी आपापल्या गावातील सहभागी व्हावे. असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. रात्री आठ वाजता हरिभजन शुक्रवार दिनांक 24 मार्च सकाळी दहा ते बारा हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज गाडेकर यांचे काल्याचे किर्तन मृदंग सात मृदंग मनी हरिभक्त पारायण राम महाराज गाडेकर आणि टाळकरी श्री संत तुकाराम महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी वरखेड दुपारी बारा ते पाच महाप्रसादाची वितरण होईल यामध्ये परिसरातील किन्होळा, खेर्डी, डोंगरखंडाळा, डोंगरशेवली  येथील सेवेकरी मंडळी सेवा देणार आहेत.

या उत्सवात भक्तांनी चारही दिवस सहभागी राहून दर्शन श्रवण आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती समस्त दलाल परिवार, बुलडाणा अर्बन परिवार व समस्त गावकरी मंडळी डोंगरखंडाळा ,खेर्डी.

Post a Comment

0 Comments